kuldeep yadav twitter/bcci
क्रीडा

IND vs ENG 3rd Test: टीम इंडियाचे खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून का उतरले मैदानात? वाचा कारण

Ankush Dhavre

India vs England 3rd Test:

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये सुरु आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडू हातावर काळ्या रंगाची पट्टी बांधून उतरले आहेत. बीसीसीआयने पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. भारताचे माजी कर्णधार आणि सर्वात वयस्कर क्रिकेटपटू दत्ताजीराव गायकवाड यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय खेळाडूंनी हातावर काळी पट्टी बांधली आहे. (Black Arm band on hand)

दिग्गज खेळाडू दत्ताजीराव गायकवाड (Dattajirao Gaekwad) यांचे १३ फेब्रुवारी रोजी वृ्द्धापकाळाने निधन झाले आहे. ते भारताचे वयस्कर क्रिकेटपटू होते. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी लिहीले की, 'भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि सर्वात वयस्कर खेळाडू दत्ताजीराव गायकवाड यांच्या आठवणीत भारतीय खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानावर उतरणार आहेत.' (Cricket news in marathi)

भारताचे सर्वात वयस्कर खेळाडू..

दत्ताजीराव गायकवाड यांनी रणजी ट्रॉफी स्पर्धेत बडोदा संघाचं प्रतिनिधित्व केलं. ते १९४७ पासून ते १९६१ पर्यंत बडोदा संघासाठी क्रिकेट खेळले. यादरम्यान त्यांनी ४७.५६ च्या सरासरीने ३१३९ धावा केल्या. यात १४ शतकांचा समावेश आहे.

तसेच नाबाद २४९ धावा ही त्यांची सर्वोत्तम खेळी आहे. ही खेळी त्यांनी १९५९-६० च्या रणजी हंगामात महाराष्ट्र संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात केली होती. २०१६ मध्ये ते भारताचे सर्वात वयस्कर खेळाडू ठरले होते. यापूर्वी दिपक शोधने हे भारताचे सर्वात वयस्कर क्रिकेटपटू होते. त्यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले होते.

भारत- इंग्लंडमध्ये चुरशीची लढत..

भारत आणि इंग्लंडमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ४४५ धावा केल्या आहेत. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने दुसऱ्या दिवसअखेर २ गडी बाद २०७ धावा केल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT