Sunil Gavaskar On Cheteshwar Pujara, Team India SAAM TV
Sports

Sunil Gavaskar On Cheteshwar Pujara : ...मग पुजाराच बळीचा बकरा का?; सुनील गावसकर सॉलिड भडकले!

Ind Vs WI, Team India Squad : वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाली असून, कसोटीपटू चेतेश्वर पुजाराला स्थान देण्यात आलं नाही.

Nandkumar Joshi

Ind Vs WI, Team India Squad : वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाली असून, कसोटीपटू चेतेश्वर पुजाराला स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे महान क्रिकेटपटू सुनील गावसकर कमालीचे संतापले आहेत.

वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची (Team India) घोषणा नुकतीच झाली. बीसीसीआयच्या निवड समितीने शुक्रवारी संघ जाहीर केला. कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याला कसोटी संघातून वगळले आहे. मात्र, या निर्णयाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अनेकांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. माजी कसोटीपटू सुनील गावसकर यांनाही हा निर्णय आवडला नाही. (Latest sports updates)

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चेतेश्वर पुजाराला संधी मिळाली होती. त्याआधी काउंटी क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजारानं धमाकेदार कामगिरी केली होती. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात पुजाराला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. पुजाराने पहिल्या डावात १४ धावा आणि दुसऱ्या डावात फक्त २७ धावाच केल्या.

गावसकरांची नाराजी

चेतेश्वर पुजाराला कसोटी संघात स्थान न मिळाल्याने सुनील गावसकर यांनी स्पोर्ट्स तकशी बोलताना नाराजी व्यक्त केली. पुजाराला संघात न घेण्याचा निर्णय धक्कादायक होता. पुजारालाच लक्ष्य का केले? त्याने असे काय चुकीचे केले, जे इतर खेळाडूंनी केले नाही. पुजाराच बळीचा बकरा का? असा सवालही त्यांनी केला.

पुजाराकडे असे लोक नाहीत, इतके फॉलोअर्स नाहीत, जे त्याच्यासाठी आवाज उठवतील, घोषणा देतील. संघातून वगळण्याचे काही निकष असतील तर ते सर्वांसाठी असावेत, कुणा एकासाठी नाही, असे खडेबोलही गावसकर यांनी सुनावले.

युवा क्रिकेटपटूंना संधी मिळायला हवी होती...

गावसकर म्हणाले की, निवड समितीच्या सदस्यांनी वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी युवा खेळाडूंचा संघ निवडायला हवा होता. विराट कोहली, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती द्यायला हवी होती. यावर्षी वनडे वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे आणि हे सर्व खेळाडू अविश्रांत क्रिकेट खेळत आहेत. अशावेळी त्यांना विश्रांती द्यायला हवी होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT