hardik pandya out of odi squad saam tv
Sports

Hardik Pandya Out : हार्दिक पंड्याला वनडे संघात का घेतलं नाही?; BCCI सांगितलं महत्वाचं कारण

Ind vs NZ ODI Series : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, ऑलराउंडर हार्दिक पंड्याला स्थान देण्यात आलं नाही. याबाबत बीसीसीआयने कोणतं महत्वाचं कारण दिलं आहे, हे जाणून घेऊयात.

Nandkumar Joshi

भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिका होणार आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. या संघात श्रेयस अय्यर आणि यशस्वी जयस्वालचं कमबॅक झालं आहे. मात्र, जबरदस्त फॉर्मात असलेल्या हार्दिक पंड्याला संघात स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळं बीसीसीआयच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. मात्र, खुद्द बीसीसीआयनं हार्दिकला संघात न घेण्यामागचं कारण दिलं आहे.

बीसीसीआयनं नुकतीच न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा शुभमन गिलकडे देण्यात आली आहे. तर श्रेयस अय्यरची वापसी झाली आहे. त्याला उपकर्णधारपद दिलं आहे. दुखापतीमुळं तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळू शकला नव्हता. विशेष म्हणजे हार्दिक पंड्याला संधी देण्यात आली नाही.

बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सेलन्सच्या अधिकाऱ्यांनी हार्दिक पंड्याला एका सामन्यात १० षटके टाकण्याची परवानगी दिलेली नाही. याशिवाय आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२६ च्या दृष्टीने त्याचा वर्कलोड मॅनेज करण्यात येत आहे, असे कारण बीसीसीआयने दिले आहे. त्यामुळेच हार्दिक पंड्याला वनडे मालिकेसाठी संघात स्थान दिलेले नाही. टी २० वर्ल्डकपआधी हार्दिक पंड्या पूर्णपणे तंदुरुस्त असायला हवा, यावर बीसीसीआयचे लक्ष केंद्रीत आहे.

हार्दिक जबरदस्त फॉर्मात

हार्दिक पंड्याने दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या टी २० मालिकेत जबरदस्त फलंदाजी केली होती. ही मालिका जिंकून देण्यात हार्दिकचा मोलाचा वाटा होता. या मालिकेत त्याने दोन अर्धशतके ठोकली. तर तीन विकेट्सही घेतल्या.

हार्दिक पंड्या भारतीय संघासाठी अखेरचा वनडे सामना २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला होता. त्यानंतर त्याला वनडे संघात स्थान देण्यात आलेले नाही. भारतीय संघासाठी त्याने २०१६ मध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून तो भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू ठरला आहे. त्याने आतापर्यंत ९४ वनडे सामन्यांत १९०४ धावा केल्या आहेत. त्यात ११ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच ९१ विकेट्सही त्याने घेतल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप मंत्र्याच्या मुलाचा माज, कारने अनेकांना उडवलं; नंतर जमलेल्या स्थानिक लोकांवर पिस्तुल ताणली

Iran vs US Tensions: खामेनेईंच्या टार्गेटवर सुन्नी देश, इराणचे खतरनाक चार प्लॅन

Crime News: दिप्तीनंतर आता कीर्ती! बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं; १०लाखांसाठी अमानुष छळ; आणखी एका विवाहितेनं संपवलं आयुष्य

चंद्रपूरचा महापौर भाजपचा की काँग्रेसचा? महापालिकेची सूत्रं 'मातोश्री'च्या हाती? VIDEO

Special Report : महायुतीत ठणाठणी! शिंदेसेनेचं भाजपच्या नाईकांना ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT