ajit agarkar twitter
Sports

Ajit Agarkar On Hardik Pandya: ...म्हणून हार्दिकला काढून सूर्याला कॅप्टन केलं; आगरकरांनी सांगितलं खरं कारण

Team India T20I Captaincy: रोहित शर्मानंतर भारतीय संघाच्या टी-२० कर्णधारपदी सूर्यकुमार यादवची निवड करण्यात आली आहे. हा निर्णय का घेतला याबाबत अजित आगरकरांनी मोठा खुलासा केला आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती. ही स्पर्धा झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलं होतं. त्यामुळे कर्णधारपदाची खुर्ची रिकामी झाली होती. ही जागा घेण्यासाठी आधी हार्दिक पंड्याला प्रबळ दावेदार मानलं जात होतं.

मात्र त्यानंतर सूर्यकुमार यादवने आघाडी घेतली. सूर्याची कर्णधार म्हणून निवड झाली. तर दुसरीकडे हार्दिकला आपलं उप कर्णधारपदही गमवावं लागलं. दरम्यान हार्दिकऐवजी सूर्यकुमार यादवला ही जबाबदारी का दिली?याबाबत अजित आगकरांनी खुलासा केला आहे.

सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर अनेक प्रश्नही उपस्थित केले गेले होते. आता अजित आगरकरांनी या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. ते म्हणाले की, 'सूर्यकुमार यादव हा सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. तो कर्णधारपदासाठी पात्र आहे. तसेच हार्दिकही आमच्यासाठी तितकाच महत्वाचा आहे. आमची अशी इच्छा आहे की,हार्दिकने आमच्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडावी. मात्र फिटनेस हा मोठा फॅक्टर आहे. तो फिटनेस संबधित समस्यांशी झुंज देत आहे. आम्ही अशा खेळाडूंवर लक्ष केंद्रित करतोय ,जे संघासाठी नेहमी उपलब्ध असतील.'

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे,अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्नोई.

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, केएल राहुल,शिवम दुबे, कुलदीप यादव, रिषभ पंत, श्रेयस अय्यर,खलील अहमद, हर्षित राणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kite Making Ideas: मुलांच्या प्रोजेक्टसाठी पतंग बनवायचाय? या टीप्स फॉलो करा, ५ मिनिटांत झटपट होईल तयार

HSC Board Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून मिळणार ऑनलाईन हॉल तिकीट; कसं कराल डाउनलोड ? वाचा

Ukadiche Modak Recipe : सारण भरल्यावर उकडीचे मोदक फुटतात? मग 'ही' रेसिपी एकदा फॉलो कराच

Bigg Boss Marathi 6 : पहिल्याच दिवशी सदस्यांची झोप उडाली; बिग बॉसच्या घराचं दार बंद, कोणता टास्क रंगणार?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 'या' दिवशी मिळणार ₹३०००; सरकारने उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT