Know Why Cristiano Ronaldo wasn't allowed to create YouTube channel: फुटबॉल विश्वातील जगप्रसिद्ध खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आपल्या मैदानावरील कामगिरीमुळे नेहमीच चर्चेत असतो. सर्वाधिक गोलचा रेकॉर्ड आपल्या नावावर असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो यावेळी मैदानातील कामगिरीमुळे नव्हे, तर वेगळ्याच कामगिरीमुळे चर्चेत आला आहे.
या खेळाडूची लोकप्रियता इतकी अफाट आहे की, मी युट्यूब चॅनेल उघडलंय अशी घोषणा करताच त्याच्या सब्स्क्राईबर्सची संख्या तासाभरात मिलियन्समध्ये जाऊन पोहोचली. मात्र तुम्हाला माहितेय का? ख्रिस्तियानो रोनाल्डोला युट्यूब आणि टिकटॉक अकाऊंट बनवण्यावर बंदी घातली होती. काय आहे कारण? जाणून घ्या.
ख्रिस्तियानो रोनाल्डोचा चाहतावर्ग हा जगभरात पसरला आहे. इंस्टाग्रामवर ६३३ हून अधिक फॉलोवर्स असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने युट्यूब चॅनेल ओपन करत असल्याची घोषणा केली आणि युट्यूब हँग करुन सोडलं.
अवघ्या काही तासात त्याच्या सब्स्क्राईबर्सची संख्या मिलियन्समध्ये जाऊन पोहोचली. यादरम्यान त्याने तासाभरात सर्वाधिक सब्स्क्राईबर्सचा रेकॉर्डही मोडून काढला आहे. यापूर्वी के-पॉप स्टार जेनी किमने युट्यूब चॅनेल ओपन केल्यानंतर ७ तासात १ मिलियन फॉलोवर्सचा टप्पा गाठला होता. दरम्यान रोनाल्डोने अवघ्या ९० मिनिटात हा टप्पा गाठत इतिहास रचला आहे.
फुटबॉलचा बादशहा असणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोची सोशल मीडिया फोलोइंग अफाट आहे. मात्र त्याला युट्यूब आणि टिकटॉक अकाऊंट उघडण्यावर बंदी घालण्यात आली होती. हे खोटं वाटत असलं तरी खरं आहे.
स्पोर्ट्स बिग न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ३९ वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डोने जर युट्यूब चॅनेल उघडलं, तर त्याच्या चॅनेलचे सब्स्क्राईबर्सची संख्या अफाट असेल आणि व्हिडिओवर येणारे व्ह्यूज देखील बिलियन्समध्ये असतील. हे प्लॅटफॉर्मच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करु शतके. त्यामुळे त्याला युट्यूब चॅनेल ओपन करण्यावर बंदी घातली गेली होती.
ख्रिस्तियानो रोनाल्डोने २०२३ मध्ये टिकटॉकवर अकाऊंट ओपन केलं होतं. मात्र अवघ्या काही तासात त्याच्या फॉलोवर्सची संख्या ही मिलियन्समध्ये जाऊन पोहोचली. व्हिडिओवर येणारे व्ह्यूज हे बिलियन्समध्ये होते. त्यामुळे टिकटॉकने त्याचं अकाऊंट बॅन करण्याचा निर्णय घेतला होता. अकाऊंट बॅन करताना टिकटॉकने कुठलंही स्पष्टीकरण दिलं नव्हतं. माध्यमातील वृत्तानुसार, ख्रिस्तियानो रोनाल्डोला पैसे देण्यासाठी टिकटॉक आर्थिकदृष्ट्या तितके सक्षम नव्हते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.