Cristiano Ronaldo : रोनाल्डोवर निलंबनाची कारवाई; भर मैदानात केलेल्या 'त्या' कृतीमुळे भरावा लागला ५ हजार डॉलर्सचा दंड

Cristiano Ronaldo Suspended: पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोला सौदी प्रो लीग फुटबॉलमध्ये निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. रविवारी अल नासरने स्थानिक प्रतिस्पर्धी अल शबाबचा ३-२ असा पराभव केला.
Cristiano Ronaldo
Cristiano RonaldoGoogle
Published On

Cristiano Ronaldo Suspended:

पुर्तगालचा स्टार फुटबॉल खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डोवर मोठी कारवाई करण्यात आलीय. रोनाल्डोवर एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलं आहे. सौदी प्रो लीग फुटबॉलच्या सामन्यात अल नासरसाठी सामना खेळताना त्याने केलेल्या कृत्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आलीय. (Latest News)

रविवारी अल नासरने स्थानिक प्रतिस्पर्धी अल शबाबचा ३-२ असा पराभव केला. या सामन्यानंतर रोनाल्डोने प्रतिस्पर्धी संघाच्या समर्थकांकडे पाहत अश्लील हावभाव केले. त्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. दरम्यान अल नासरला पुढील सामना अल हझमविरुद्धात खेळाचा आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मेस्सी-मेस्सीच्या घोषणा

प्रेक्षक त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या नावाने 'मेस्सी-मेस्सी' अशा घोषणा देत होते. सौदी अरेबिया फुटबॉल फेडरेशनच्या शिस्तपालन आणि आचार समितीने गुरुवारी सोशल मीडियावर निलंबनाची घोषणा केली. रियाल मॅड्रिड आणि मँचेस्टर युनायटेडचा माजी स्टार रोनाल्डो याला अल शबाबला सुमारे ५ हजार डॉलर्स आणि दंड म्हणून अर्धी रक्कम फेडरेशनला द्यावी लागेल. विशेष म्हणजे रोनाल्डोला या निर्णयाविरुद्ध अपीलही करता येणार नाहीये.

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, रोनाल्डोने समितीला आपल्या हावभावाविषयी स्पष्टीकरण दिलं आहे. असा हा हावभाव विजयाचा होता. असे हावभाव युरोपमध्ये सामान्य असतात. दरम्यान रोनाल्डो वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. अल नासरमध्ये सामील झाल्यानंतर रोनाल्डो वादाच्या केंद्रस्थानी येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये अल-हिलालविरुद्धच्या सामन्यानंतर तो परत असताना चाहत्यांनी मेस्सीच्या नावाच्या घोषणा दिल्या. तेव्हाही रोनाल्डोने असभ्य वर्तन केले होते.

Cristiano Ronaldo
Rupay Volleyball League: तिसऱ्या रूपे प्राईम व्हॉलिबॉल लीग स्पर्धेत मुंबई मेटीयॉर्सकडून कॅलिकत हिरोजचा पहिला पराभव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com