Rohit Sharma Opening Partner saam tv
Sports

CSK vs MI : ईशानची जागा कोण घेणार? रोहितसोबत सलामीला कोण उतरणार? 'या' 3 खेळाडूंची नावं चर्चेत

Rohit Sharma Opening Partner: मुंबई इंडियन्ससाठी यंदाच्या हंगामात रोहित शर्मासोबत कोण सलामीला येणार, याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मागील सिझनमध्ये इशान किशन हा रोहितचा ओपनिंग पार्टनर होता, पण यावेळी तो संघात नाही.

Surabhi Jayashree Jagdish

आयपीएलचा 18वा सिझन सुरू झाला आहे. स्पर्धेतील पहिला सामना KKR आणि RCB यांच्यात खेळवला गेला. या ज्यामध्ये रजत पाटीदारच्या टीमने 7 विकेट्स राखून विजय मिळवला. आता चाहते मेगा स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्याची आतुरतेने वाट पाहतायत. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या टीम्स एकमेकांसमोर येणार आहेत. हा सामना 23 मार्च रोजी चेपॉकमध्ये संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे.

दरम्यान या सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्मासोबत कोण खेळाडू ओपनिंग करणार याबाबच चाहते उत्सुक आहेत. गेल्या सिझनमध्ये इशान किशन हा रोहितचा ओपनिंगचा जोडीदार होता. मात्र आता तो मुंबई इंडियन्सच्या टीमचा भाग नाही. अशा स्थितीत यावेळी हिटमॅनचा नवा ओपनर पार्टनर कोण असणार ते पाहूयात. यावेळी ३ खेळाडूंच्या नावाची चर्चा आहे जे रोहितसोबत ओपनिंग करणार आहेत.

रायन रिकेल्टन

मुंबई इंडियन्सकडे रायन रिकेल्टन हा रोहितसोबत ओपनर म्हणून एक पर्याय आहे. या 28 वर्षीय दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूने अलीकडेच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पहिल्याच सामन्यात शानदार शतक झळकावलं होतं. शिवाय त्याने SA20 लीगच्या तिसऱ्या सिझनमध्येही चांगली खेळी केली होती. रिकेल्टनचा सध्याचा फॉर्म खूपच जबरदस्त असून तो मुंबईला वेगवान सुरुवात करून देऊ शकतो.

विल जॅक्स

इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर विल जॅक हा आयपीएल 2024 मध्ये आरसीबी टीमचा भाग होता. मात्र या सिझनमध्ये तो मुंबई इंडियन्ससाठी खेळण्यासाठी सज्ज आहे. रोहितचा ओपनर जोडीदार होण्याच्या शर्यतीत जॅकचं नाव आघाडीवर आहे. विलला अनेक मोठ्या T20 लीगमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. जॅकने या फॉरमॅटमध्ये 5000 हून अधिक रन्स केले आहेत. त्यामुळे विल जॅक्स देखील एक चांगला पर्याय असू शकतो.

रॉबिन मिंन्झ

युवा विकेटकीपर फलंदाज रॉबिन मिन्झ आयपीएलच्या या सिझनमधये मुंबई इंडियन्स टीमचा एक भाग आहे. गेल्या सिझनमध्ये मात्र अपघातामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला होता. मिन्झने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजी केली आहे. हा युवा फलंदाज हार्ड हिटिंगसाठी ओळखला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT