who was josh baker and what was the Reason behind his death amd2000 twitter
क्रीडा

Josh Baker Death: इंग्लंडच्या २० वर्षीय जोश बेकरच्या मृत्यूचं नेमकं कारण काय?

Ankush Dhavre

एक दिवसाआधी आपल्या संघासाठी लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या खेळाडूने दुसऱ्याच दिवशी जगाचा निरोप घेतला आहे. काळजाला भिडणारी ही घटना इंग्लंडमध्ये घडली आहे. इंग्लंडचा युवा खेळाडू जोश बेकरने वयाच्या २० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. बेकरच्या जाण्याने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. दरम्यान जोश बेकरच्या मृत्यूचं नेमकं कारण काय? जाणून घ्या.

जोश बेकरच्या मृत्यूचं नेमकं कारण काय? (Josh Baker Death Reason)

जोश बेकर हा वूस्टरशायर संघाचं प्रतिनिधित्व करायचा. वूस्टरशायर आणि समरसेट या दोन्ही संघांमध्ये सामना सुरू होता. या सामन्यात बुधवारी खेळताना त्याने शानदार कामगिरी केली आणि ३ गडी बाद केले. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सहखेळाडू त्याच्या येण्याची वाट पाहत होते. मात्र तो काही आलाच नाही. त्यामुळे त्याचा मित्र बोलण्यासाठी गेला असता, जोश बेकर त्याला मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर हा सामनाही रद्द करण्यात आला. वूस्टरशायर संघाने त्याच्या मृत्यूची माहिती दिली. मात्र कुटुंबाची गोपनीयता लक्षात घेऊन, जोशचा मृत्यू का आणि कसा झाला हे सांगण्यात आलेलं नाही. मात्र माध्यमातील वृत्तानुसार, त्याचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं म्हटलं जात आहे.

कोण होता जोश बेकर? (Who Was Josh Baker)

इंग्लंडचा २० वर्षीय जोश बेकर हा वूस्टरशायरकडून प्रोफेशनल क्लब क्रिकेट खेळायचा. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर , त्याने वयाच्या १७ व्या वर्षी प्रोफेशनल क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २२ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याला ४३ गडी बाद करता आले. तर लिस्ट ए क्रिकेटमधील २५ सामन्यांमध्ये त्याला २७ गडी बाद करता आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT