who is aaron jones twitter
क्रीडा

Who Is Aaron Jones: आरोन जोन्स आहे तरी कोण?अमेरिकेसाठी पहिल्याच सामन्यात ठोकले विक्रमी १० षटकार

who Is Aaron Jones, USA vs Canada: कॅनडा विरुद्ध झालेल्या सामन्यात अमेरिकेच्या आरोन जोन्सने वादळी खेळी केली आणि आपल्या संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत यजमान अमेरिकेने विजयी सलामी दिली आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात अमेरिकेने विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करत ऐतिहासिक विजय मिळवला. आव्हान मोठं होतं, मात्र अमेरिकेकडून आरोन जोन्स खंबीरपणे उभा राहिला. त्याने १० षटकार खेचत नाबाद ९४ धावांची खेळी केली आणि अमेरिकेला एकतर्फी विजय मिळवून दिला. अमेरिकेला ऐतिहासिक विजय मिळवून देणारा आरोन जोन्स नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या. (Who Is Aaron Jones)

आरोन जोन्स आहे तरी कोण?

आरोन जोन्सचा जन्म १९ ऑक्टोबर १९९४ रोजी न्यूयॉर्कच्या क्वीन्समध्ये झाला. त्याचे आई वडील मूळचे बार्बाडोसचे आहेत. २०१६ मध्ये त्याने बार्बाडोससाठी लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे २०१७ मध्ये त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. बार्बाडोसकडून खेळत असताना त्याला जेसन होल्डर, शाई होप आणि निकोलस पुरनसारख्या क्रिकेटपटूंसोबत खेळण्याची संधी मिळाली.

मात्र त्यानंतर त्याने अमेरिकेकडून खेळण्याचा निर्णय घेतला. २०१८ मध्ये तो अमेरिकेकडून खेळू लागला. २०१९ मध्ये त्याला अमेरिकेकडून वनडे आणि टी-२० संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. यासह तो अमेरिकेकडून वनडे टी -२० क्रिकेट खेळणारा पहिलाच फलंदाज ठरला. इथून त्याच्या क्रिकेट कारकीर्दीला सुरुवात झाली आणि आता तो अमेरिकेच्या विजयाचा हिरो ठरला आहे.

आरोन जोन्सच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याला आतापर्यंत ४३ वनडे आणि २७ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. वनडे क्रिकेटमधील ४३ डावात त्याने ३६.३५ च्या सरासरीने १४५४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १० अर्धशतकं आणि १ शतक झळकावलं आहे. तर टी -२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावे ४७८ धावा करण्याची नोंद आहे. यादरम्यान त्याने २ अर्धशतक आणि कॅनडाविरुद्ध केलेली ९४ धावांची खेळी ही त्याच्या टी -२० क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी ठरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रात भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्त

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT