tanush kotian twitter
Sports

Tanush Kotian: टीम इंडियात अश्विनची जागा घेणारा तनुष कोटियान आहे तरी कोण?

Who Is Tanush Kotian: आर अश्विनने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याच्या जागी तनुष कोटियानला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. दरम्यान तनुष कोटियान आहे तरी कोण?

Ankush Dhavre

काही दिवसांपूर्वीच आयपीएल २०२५ स्पर्धेचा लिलाव पार पडला. या लिलावात देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळणारा तनुष कोटियान अन्सोल्ड राहिला होता. या लिलावात संधी न मिळाल्यानंतर आता त्याच्या क्रिकेट कारकीर्दीत असं काही घडलंय, ज्याचा त्याने विचारच केला नसेल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय कसोटी संघात मोठा बदल करण्यात आला आहे. युवा फिरकीपटू तनुषचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

गाबा कसोटी झाल्यानंतर अश्विनने कसोटी क्रिकेटला रामराम केलं होतं त्याची रिप्लेसमेंट म्हणून तनुषला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. दरम्यान तनुष आहे तरी कोण? जाणून घ्या.

उत्कृष्ठ अष्टपैलू खेळाडू

तनुष मुंबईचा खेळाडू आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो मुंबईकडून खेळतो. तो देखील अश्विन सारखाच अष्टपैलू गोलंदाज आहे. यासह फलंदाजीतही योगदान देतो. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. यादरम्यान त्याने गोलंदाजीत १०१ आणि फलंदाजी करताना २ शतकं झळकावली आहेत.

मुंबईला बनवलंय चॅम्पियन

रणजी ट्रॉफी २०२३-२४ स्पर्धेचा अंतिम सामना मुंबई आणि विदर्भ या दोन्ही संघामध्ये पार पडला होता. या सामन्यात त्याने ७ गडी बाद केले होते. संपूर्ण स्पर्धेत त्याने २९ गडी बाद केले होते.

सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना झळकावलं शतक

तनुष कोटियान मुंबईकडून खेळताना दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने शानदार शतकी खेळी केली होती. हे शतक त्याने मुंबई विरुद्ध बडोदा यांच्यात झालेल्या क्वार्टरफायनलच्या सामन्यात झळकावले होते. याच सामन्यात ११ व्या क्रमांकावर खेळताना तुषार देशपांडेनेही शतक झळकावलं होतं.

अंडर १९ क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व

तनुष कोटियानला पहिल्यांदाच वरिष्ठ भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. मात्र यापूर्वी त्याला २०१७ मध्ये भारतीय अंडर १९ संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याने अंडर १९ क्रिकेटमध्ये शुभमन गिल, अर्शदीप सिंग आणि रियान परागसारख्या खेळाडूंसह ड्रेसिंग रुम शेअर केला आहे.

IPL स्पर्धेत राजस्थान रॉयल्सकडून खेळण्याचा अनुभव

आयपीएल २०२४ स्पर्धेत तनुष कोटियानला राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळण्याची संधी मिळाली होती. या हंगामात त्याला १ सामना खेळण्याची संधी मिळाली. दरम्यान २०२५ साठी झालेल्या लिलावात कुठल्याही संघाने त्याला आपल्या संघात घेतलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

SCROLL FOR NEXT