Virat Kohli & KL Rahul Twitter
Sports

T-20 World Cup: भारताची सलामीची जोडी कोण? माजी क्रिक्रेटरने केली भविष्यवाणी

आयसीसीने यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये युएई आणि ओमान मध्ये टी-20 विश्वचषक (ICC T-20 World Cup) स्पर्धेचे स्थानांतरण केले आहे.

साम टिव्ही ब्युरो

आयसीसीने यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये युएई आणि ओमान मध्ये टी-20 विश्वचषक (ICC T-20 World Cup) स्पर्धेचे स्थानांतरण केले आहे. ही स्पर्धा सुरू होण्यास 4 महिने शिल्लक आहेत. परंतू, आतापासूनच एक प्रश्न लोकांच्या मनात येत आहे तो म्हणजे सलामविर कोण असणार? टी-20 विश्वचषकात भारतीय संघामध्ये काही लोक रोहित शर्माच्या (Rohit Sharma) बाजूने आहेत तर काही लोक विराट कोहलीच्या बाजूने आहेत. तर काहींची पसंती केएल राहुलच्या नावाला आहे.

टी-20 विश्वचषकात सलामविराच्या तुलनेत केएल राहुल (KL Rahul) टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीलाही (Virat Kohli) मागे टाकेल, असा अंदाज भारताचा माजी सलामीवीर आणि क्रिकेट समालोचक आकाश चोप्राने व्यक्त केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत कोहलीने रोहितबरोबर सलामी केली होती. हा प्रयोगही यशस्वीही झाला होता. त्यानंतर कोहली म्हणाला होता यापुढेही मी रोहीत सोबत सलामीला येईल. याचे कारण देताना कोहीली म्हणाला होता की आमच्या दोघांपैकी कोणी तरी एक क्रिजवर टिकून राहिल.

आपल्या यूट्यूब वाहिनीवर चाहत्यांना उत्तर देताना आकाश म्हणाला, “भारताकडे सलामवीर म्हणून बरेच पर्याय आहेत. शिखर धवन, केएल राहुल आणि विराट कोहलीही आहे. पृथ्वी शॉ ला निवडणे हा देखील चांगला पर्याय असेल. टी-20 क्रिक्रेटमध्ये तो सर्वोत्तम फलंदाज आहे. पृथ्वी प्रत्येकच सामन्यात धावा करेल याची शाश्वती नाही. परंतू, तो ज्या सामन्यात धावा करेल तो सामना भारत जिंकेल.

आकाश चोप्रा पुढे म्हणाला, “कोहली आणि केएल राहूल यांच्या नावाला जास्त पसंती असेल. ऋषभ पंत मधल्या फळीत चांगली फलंदाजी करु शकतो, म्हणूनच राहूलची पसंती ही सलामवीर म्हणून जास्त असेल. हार्दिक पंड्या, पंत आणि रवींद्र जडेजा हे मध्यक्रम सांभाळतील. त्यामुळे मी सलामीला राहुल आणि तिसर्‍या क्रमांकावर कोहलीचा खेळवेल. पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड आणि देवदत्त पडिकक्कल हेदेखील टी-20 विश्वचषकात सलामीवीरच्या शर्यतीत असतील.

युएईमध्ये टीम इंडियासाठी वातावरण अनुकूल असेल. खेळपट्टीवर फिरकीपटूंना मदत होईल अशी अपेक्षा आहे. बहुतेक भारतीय खेळाडू आयपीएल खेळले असतील त्यामुळे त्यांना अधिक फायदा होईल. भारतीय संघ 14 वर्षांचा दुष्काळ संपविण्यात यशस्वी होईल, अशी आशा क्रिकेटप्रेमींना आहे. 2007 पासून टीम इंडिया टी-20 विश्वचषक जिंकू शकली नाहीये.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT