rohit sharma twitter
Sports

Rohit Sharma: रोहित कसोटी क्रिकेटला रामराम करणार? जवळच्या व्यक्तीने केला मोठा खुलासा

Rohit Sharma Retirement: रोहित शर्माचे बालपणीचे कोच दिनेश लाड यांनी रोहित शर्माबाबत मोठा खुलासा केला आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेने पराभूत करत जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली.

ही स्पर्धा झाल्यानंतर रोहित शर्माने निवृत्ती जाहीर केली होती. येत्या काही दिवसात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. दरम्यान ही स्पर्धा झाल्यानंतर रोहित शर्मा निवृ्त्त होणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत त्याच्या बालपणीच्या कोचने मोठा खुलासा केला आहे.

रोहित शर्माच्या निवृत्तीवर काय म्हणाले दिनेश लाड?

रोहित शर्माचे बालपणीचे हेड कोच दिनेश लाड यांनी रोहित शर्माच्या निवृत्तीच्या अफवांना फेटाळून लावलं आहे. दैनिक जागरणला दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिनेश लाड म्हणाले की, ' वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर रोहित निवृत्ती जाहीर करणार, मी असं म्हणतच नाहीये. पण तो असं करुही शकतो. कारण त्याचं वय वाढतंय हे पाहून असं वाटतंय की, तो कसोटी क्रिकेटला रामराम करु शकतो. एक कारण असंही असू शकतं की, तो स्वत:ला वनडे क्रिकेसाठी फिट ठेवतोय. मी तुम्हाला आश्वासन देतोय, की रोहित शर्मा २०२७ चा वर्ल्डकप खेळणार. '

रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाची शानदार कामगिरी

आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार भारतात पार पडला होता. या स्पर्धेत भारतीय संघाने शानदार कामगिरी करत फायनलमध्ये प्रवेश केला. मात्र फायनलमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या स्पर्धेत भारतीय संघाने ११ सामने खेळले. यापैकी १० सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला.

सुरुवातीच्या १० सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला. मात्र ११ व्या आणि महत्वाच्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आगामी वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. या स्पर्धेपर्यंत रोहित ३९ वर्षांचा होईल. ही स्पर्धा जर सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात झाली, तर रोहित ४० वर्षांचा होणार आहे. त्यामुळे जर रोहितला वनडे वर्ल्डकप खेळायचा असेल, तर स्वत:ला फिट ठेवावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूरमध्ये जुनी मिल कंपाऊंड परिसरात छऱ्याच्या गोळ्यांचा स्फोट

मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; भावाने घेतला तडकाफडकी निर्णय, देशाच्या राजकारणात खळबळ

वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शाळा, सलग दुसऱ्या दिवशी पीएम मोदींचं आवाहन, १० महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर

MIM च्या नेत्याचं नगरसेवकपद जाणार? महापालिका झटका देणार, काय आहे प्रकरण?

Sabja Seeds For Hair Growth: केसांच्या वाढीसाठी सब्जा खाण्याची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT