suresh raina and ms dhoni
suresh raina and ms dhoni  saam tv
क्रीडा | IPL

Suresh Raina On MS Dhoni: धोनी 'या' दिवशी खेळणार आपला शेवटचा सामना; सुरेश रैनाने केला खुलासा

Ankush Dhavre

MS Dhoni Retirement : एमएस धोनी निवृत्ती केव्हा घेणार अशा अनेक चर्चा सुरू आहेत. आयपीएल २०२३ चे हंगाम सुरू होण्यापूर्वी धोनीचं हे शेवटचं हंगाम असू शकतं अशा चर्चा रंगायला सुरुवात झाली होती.

आता धोनीचा खास मित्र आणि माजी भारतीय खेळाडू सुरेश रैनाने धोनीच्या निवृत्तीबाबत वक्तव्य केलं आहे.

एमएस धोनीने ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. असे म्हटले जर होते की, हेच त्याचे आयपीएल कारकिर्दीतील शेवटचे वर्ष असेल. मात्र त्यानंतरही ३ वर्षे तो मैदानात उतरून चाहत्यांचे मनोरंजन करत राहिला. दरम्यान आयपीएल २०२३ हे त्याच्या कारकिर्दीतील शेवटचे हंगाम असेल अशा चर्चा सुरू असताना, सुरेश रैनाचं म्हणणं आहे की तो अजून १ वर्ष खेळू शकतो.

सुरेश रैनाने धोनीच्या निवृत्तीबाबत बोलताना म्हटले की, ' तो (एमएस धोनी) तर असं बोलत आहे की, मी ट्रॉफी जिंकून अजून एक वर्ष खेळणार. तो अजूनही फिट दिसतोय. चांगली फलंदाजीही करतोय. संघाचं कॉम्बिनेशन देखील परफेक्ट आहे. सामना झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की, धोनीची शाळा भरते.'

तसेच तो पुढे म्हणाला की, ' तुम्ही पाहु शकता की, अनेक युवा खेळाडू त्याच्याकडे येतात आणि त्याच्याकडून काही नवीन गोष्टी शिकत असतात. निवृत्ती घ्यायची की नाही हा पूर्णपणे त्याचा निर्णय असणार आहे. मी जितका त्याच्यासोबत खेळलो आहे. माझा अनुभव पाहता त्याने आणखी एक वर्ष खेळावं. (Latest sports updates)

आज चेन्नई - दिल्ली येणार आमने सामने..

आज आयपीएल २०२३ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना आज संध्याकाळी ७:३० वाजता चेपॉकच्या मैदानावर रंगणार आहे. चेन्नईचा संघ सध्या गुणतालिकेत १३ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर दिल्लीचा संघ ८ गुणांसह सर्वात शेवटी आहे.

अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेइंग ११:

चेन्नई सुपर किंग्ज (CSK Playing 11):

ऋतुराज गायकवाड़, डेवोन कॉनव्हे, अजिंक्य रहाणे, मोइन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), दीपक चाहर, मथिशा पथिराना, तुषार देशपांडे, महिश थिक्षणा

दिल्ली कॅपिटल्स (DC Playing 11):

फिलिप सॉल्ट, डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), राइली रूसो, मनीष पांडे. अक्षर पटेल, अमन खान, रिपल पटेल, मुकेश कुमार, कुलदीप यादव, इशांत शर्मा, खलील अहमद.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Team India Sqaud: BCCI कडून मोठी चूक? टीम इंडियात निवड झालेल्या हे 2 खेळाडू IPL 2024 स्पर्धेत सुपरफ्लॉप

Today's Marathi News Live : ठरलं! भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार

Benifits of Walnuts in Summer: उन्हाळ्यात अक्रोड खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का?

Online Ration Card : घरबसल्या बनवा तुमचं रेशन कार्ड; कसं? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Agriculture News : उन्हाळी मुगावर करपा रोगाचा प्रादुर्भाव; उत्पादनात घट होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT