paris paralympics twitter
Sports

Paris Paralympics 2024: आजपासून रंगणार पॅरिस पॅरालिम्पिक्सचा थरार! केव्हा,कधी अन् कुठे पाहता येणार?

Paris Paralympics 2024 Schedule: आजपासून पॅरिस पॅरिलिम्पिक्स स्पर्धेचा थरार रंगणार आहे. दरम्यान हा सोहळा कुठे, केव्हा अन् कधी पाहता येणार? जाणून घ्या.

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेनंतर आजपासून पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा थरार सुरु होणार आहे. या स्पर्धेत एकूण १७० देशातील ४००० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.

ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी रंगारंग ओपिनिंग सेरेमनीचा कार्यक्रम होणार आहे. हा सोहळा आज पार पडणार आहे. दरम्यान हा सोहळा भारतात केव्हा आणि किती वाजता पाहता येणार? जाणून घ्या.

केव्हा, कधी आणि किती वाजता पाहता येणार ओपनिंग सेरेमनी?

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार असून या स्पर्धेतील ओपनिंग सोहळ्याला रात्री ११:३० वाजता सुरुवात होणार आहे. हा सोहळा तुम्ही नेटवर्क १८ वर लाईव्ह पाहू शकता. यासह जियो सिनेमा अॅप आणि जियो सिनेमाच्या सांकतिक स्थळावरही लाईव्ह पाहता येणार आहे.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेप्रमाणे या स्पर्धेचा आनंदही तुम्ही वेगवेगळ्या भाषेत घेऊ शकता. या स्पर्धेचा ओपनिंग सोहळा ११:३० वाजता सुरु होईल. मात्र रात्री ८ वाजता या सोहळ्याचं प्रसारण सुरु होईल.

भारताला किती पदकं मिळू शकतात?

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी भारताकडून एकूण ८४ खेळाडू पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत. हे ८४ खेळाडू १२ खेळांमध्ये भारताला पदक जिंकवून देण्यासाठी जोर लावताना दिसतील. भारताकडून अॅथलेटीक्समध्ये सर्वाधिक ३८ खेळाडूंचा सहभाग असणार आहे.

त्यानंतर बॅडमिंटनमध्ये १३, शूटींगमध्ये १० खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करताना दिसतील. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करुन दाखवली होती. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण १९ पदकांची कमाई केली होती. हा आकडा यावेळी वाढण्याची शक्यता आहे.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरी

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण ६ पदकांची कमाई केली. ज्यात ५ कांस्य आणि १ रौप्य पदकाचा समावेश आहे. भारताकडून मनू भाकरने कांस्य,त्यानंतर मनू भाकर आणि सरबजोत सिंगच्या जोडीने कांस्यपदक जिंकलं.

त्यानंतर स्वप्नील कुसाळेने शूटींगमध्ये कांस्य, अमन सेहरावतने कुस्तीत कांस्य, भारतीय हॉकी संघाने कांस्य आणि नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्यपदक जिंकून दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT