India vs Srilanka, Asia Cup Final 2023 Match Details Saam tv
Sports

Ind vs SL, Asia Cup Final: केव्हा,कुठे अन् कधी रंगणार भारत- श्रीलंका अंतिम सामना? जाणून घ्या एकाच क्लिकवर

India vs Srilanka Asia Cup Final: जाणून घ्या या सामन्याबद्दल सर्वकाही.

Ankush Dhavre

India vs Srilanka, Asia Cup Final 2023 Match Details:

आशिया चषक २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

अंतिम फेरीत पोहचण्यासाठी भारतीय संघाने पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांवर विजय मिळवला आहे. तर श्रीलंकेने पाकिस्तान आणि बांगलादेशला धूळ चारत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे. दरम्यान हा सामना कुठे आणि कधी पाहता येईल जाणून घ्या.

कुठे रंगणार भारत - श्रीलंका अंतिम सामना ?

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणारा आशिया चषकातील अंतिम सामना कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल.

केव्हा होणार भारत - श्रीलंका अंतिम सामना ?

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणारा अंतिम सामना १७ सप्टेंबर, रविवारी होणार आहे. हा सामना दुपारी ३ वाजता सुरू होईल. तर २ वाजून ३० मिनिटांनी नाणेफेक होईल.

TV वर कुठे पाहता येईल सामना?

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणारी लढत स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येणार आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका सामना फ्रीमध्ये कुठे पाहता येईल?

भारत आणि श्रीलंकेत खेळवला जाणारा अंतिम सामना Dinsey Plus Hotstar वर फ्रीमध्ये पाहता येईल. ही सोय केवळ मोबाईल युजर्ससाठी असणार आहे.

सुपर ४ फेरीत आले होते आमने सामने..

भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ सुपर ४ फेरीतही आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत ४१ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी ३१ धावांची गरज होती. (Latest sports updates)

आशिया चषक स्पर्धेसाठी असे आहेत दोन्ही संघ..

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (यष्टिरक्षक), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, प्रसिद्ध कृष्णा आणि तिलक वर्मा.

आशिया चषकासाठी असा आहे श्रीलंकेचा संघ :

दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (यष्टिरक्षक), पथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चरिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दुनिथ वेलालागे, प्रमोद मदुशन, मथीशा पथिराना, साहन अराचचेगे, दुशान हेमंथा, कासुन रजिता, बिनुरा फर्नांडो, दिमुथ करुणारत्ने.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab : सोज्वळ साज अन् निखळ हास्य, शिवाली परबचे पाहा लेटेस्ट PHOTOS

Pitru Paksha: पितृपक्षात 'या' ३ गोष्टी घरी आणू नका, अन्यथा घरात होऊ शकतात अडचणी

Maharashtra Live News Update: धुळ्यात भयंकर अपघात, दोघांचा जागीच मृत्यू, एक जखमी

Ganpati Visarjan 2025 : पुण्यात ३० तासानंतरही विसर्जन मिरवणुका सुरुच, गणेश मंडळाने डीजे लावला अन् फटाके फोडले, पोलिसांचा आदेश धाब्यावर

शरीरात प्रोटीनची कमतरता झाल्यास दिसतात 'हे' बदल

SCROLL FOR NEXT