team india twitter
Sports

IND vs AUS: बॉक्सिंग डे कसोटी ड्रॉ झाल्यास टीम इंडियासाठी कसं असेल WTC Final मध्ये जाण्याचं समीकरण?

Team India Scenario For WTC Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना जर ड्रॉ झाला, तर भरातीय संघासाठी कसं असेल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्याचं समीकरण?

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यातील पाचव्या दिवशी भारतीय संघासमोर जिंकण्यासाठी ३४० धावांचे आव्हान आहे. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही.

अवघ्या ३० धावसंख्येवर भारताचे ३ प्रमुख फलंदाज तंबूत परतले. आता भारतीय संघ सामना जिंकण्याचा नाही, तर सामना ड्रॉ करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. दरम्यान हा सामना जर ड्रॉ झाला, तर कसं असेल भारतीय संघासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्याचं समीकरण? जाणून घ्या.

मेलबर्न कसोटी सामना ड्रॉ झाल्यास कसं असेल समीकरण?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्याची लढत आता शेवटच्या टप्प्यात जाऊन पोहोचली आहे. पाकिस्तानला नमवत दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच या स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये फायनलमध्ये जाण्यासाठी चुरशीची लढत सुरु आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना ड्रॉ झाला, तर भारतीय संघाला फार काही फरक पडणार नाही. भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या शर्यतीत टिकून राहिल. मात्र भारतीय संघाच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण भारतीय संघाला सिडनी कसोटी कुठल्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे.

भारतीय संघाने जर ही मालिका २-१ ने जिंकली, तर भारतीय संघाला श्रीलंकेवर अवलंबून राहावं लागणार आहे. कारण ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.

ही मालिका भारत आणि ऑस्ट्रेलिया यान दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाची ठरेल. श्रीलंकेने जर ही मालिका २-० ने आपल्या नावावर केली, तर भारतीय संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. जर दोन्ही सामने ड्रॉ केले, तरीदेखील भारती.य संघ फायनलमध्ये प्रवेश करु शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stress Relief Tricks : ऑफिसमध्ये काम करताना स्ट्रेस जाणवतोय? या ट्रिक करा फॉलो

Dnyanada Ramtirthkar: अवखळ हासरी, अल्लड लाजरी दिसते चंद्राची कोर साजरी ...

Pani puri masala recipe: घरीच बनवा पाणीपुरीच्या तिखट पाण्याचा सुका मसाला; एक चमचा पाण्यात घाला की काम झालंच

Anant Chaturdashi 2025 live updates : धाराशिवमध्ये जय मल्हार तरुण मंडळाने डीजेला बगल देत पारंपारिक पोतराज नृत्य सादर करत आपल्या बाप्पाची काढली मिरवणूक

Mumbai Bomb Threat: मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमागची इनसाइड स्टोरी खतरनाक, सगळेच चक्रावून गेले

SCROLL FOR NEXT