Team India News Updates
Team India News Updates Saam Tv
क्रीडा | IPL

IND vs AUS 2023 : अंतिम कसोटी सामना ड्रॉ झाल्यास टीम इंडिया होणार WTC फायनलमधून बाहेर? जाणून घ्या समीकरण

Ankush Dhavre

IND VS AUS ICC wtc final: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली होती.

तर मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने जोरदार कमबॅक करत ९ गडी राखून विजय मिळवला होता. मालिकेतील अंतिम कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे. (Latest sports updates)

इंदूर कसोटी जिंकून ऑस्ट्रेलिया संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जोरदार प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलिया संघ हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचणारा पहिला संघ ठरला आहे.

तर भारतीय संघाला देखील अंतिम फेरीत पोहचण्याची संधी असणार आहे. मात्र इंदूर कसोटीत पराभूत झाल्यामुळे भारतीय संघाचा मार्ग कठीण झाला आहे.

अहमदाबाद कसोटी अनिर्णित राहिली तर?

अहमदाबाद कसोटी सामना अनिर्णित राहिला तर भारतीय संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार का? अनेकांना असा प्रश्न पडला आहे.

असे झाल्यास श्रीलंका संघाला अंतिम फेरीत जाण्याची संधी उपलब्ध होणार आहे. श्रीलंका संघाने न्यूझीलंडविरुध्द होणाऱ्या मालिकेत जर २-० ने विजय मिळवला तर श्रीलंका संघ अंतिम फेरीत प्रवेश करू शकतो.

मात्र अहमदाबाद कसोटी सामना अनिर्णित राहूनही भारतीय संघासाठी अंतिम फेरीत जाण्याची संधी असणार आहे. असे झाल्यास, भारतीय संघाला श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या मालिकेच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.

जर न्यूझीलंड संघाने एक सामना जिंकला किंवा एक सामना अनिर्णित राहिला तरीदेखील भारतीय संघ अंतिम फेरीत प्रवेश करू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CSK vs PBKS : पंजाबने चेन्नईला सलग चौथ्यांदा नमवलं; पंजाबचा ७ गडी राखून विजय

Petrol-Diesel : या राज्यात केवळ ५०० रुपयांपर्यंतचं भरता येणार पेट्रोल-डिझेल

Rupali Ganguly: परी म्हणू की अप्सरा; रूपालीचे आउटफिट पाहून पडाल प्रेमात

Health Tips : डाएट आणि जीम न करता वजन कमी करायची इच्छा आहे? फक्त ६ टिप्स फॉलो करा

Carrot Juice: रोज सकाळी प्या गाजराचा रस, निरोगी राहाल

SCROLL FOR NEXT