लखनऊच्या एकाना स्टेडियमवर शुक्रवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या सामन्याच्या शेवटच्या ओव्हमध्ये एक विचित्र घटना घडली, ज्यामध्ये भारताचा स्टार फलंदाज तिलक वर्मा रिटायर्ड आऊट झाला.
झालं असं की, नाबाद राहूनही १९ व्या ओव्हरच्या मध्यात तिलक वर्मा ड्रेसिंग रूममध्ये परतला. तिलक वर्माला रिटायर्ड आऊट करण्यात आलं. याचं कारण असं की, ज्यावेळी टीमला चौकार आणि सिक्सेची आवश्यकता होती तेव्हा त्या तिलकला खेळता येत नव्हतं. या सामन्यात तिलकने २३ बॉल्समध्ये २५ रन्स केले. मुंबई इंडियन्सला मोठ्या शॉर्ट्सची आवश्यकता असल्याने त्यांना फॉर्ममध्ये नसलेल्या तिलक वर्माला माघारी बोलवावं लागलं.
सामन्याच्या दुसऱ्या डावात विघ्नेश पुथूरची जागा तिलक वर्माने घेतली. पण यावेळी तो आपला प्रभाव दाखवू शकला नाही. त्याच्या जागी मिचेल सँटनरला मैदानात पाठवण्यात आलं. पण मुंबईचा हा फॉर्म्युला त्यांच्यासाठी कामी आला नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये टीमला १२ रन्सने पराभव स्विकारावा लागला.
कमेंटेटर हरभजन सिंगने यावेळी तिलकच्या रिटायर्ड आऊट होण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भज्जी म्हणाला, की तिळकला रिटायर्ड आऊट करून सँटनरला मैदानात बोलावण्याचा निर्यण त्यांच्या समजण्यापलीकडचा आहे.
जोपर्यंत सूर्यकुमार यादव क्रीजवर होता तोपर्यंत मुंबईचा विजय निश्चित वाटत होता. पण १७ व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर अवेश खानने सूर्यकुमारला बाद केलं. यानंतर, कर्णधार हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांच्यावर जबाबदारी आली. १९ व्या ओव्हरमध्ये पाचव्या बॉलवर मुंबईने तिलकला परत बोलावलं आणि रिटायर आउट झाला.
जेव्हा एखादा फलंदाज अंपायर किंवा विरोधी टीमच्या कर्णधाराशी सल्लामसलत/संमती न घेता पॅव्हेलियनमध्ये जातो तेव्हा त्याला रिटायर्ड आउट मानलं जातं. नियमांनुसार, ही विकेट मानली जाते. एकदा फलंदाज रिटायर्ड आऊट झाला की तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकत नाही.
आयपीएलच्या इतिहासात निवृत्ती घेणारा तिलक वर्मा हा चौथा खेळाडू ठरला. रविचंद्रन अश्विन हा आयपीएलमध्ये निवृत्ती घेणारा पहिला खेळाडू होता. जेव्हा तो २०२२ च्या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सकडून लखनऊ विरुद्ध खेळला होता. आयपीएल २०२३ मध्ये गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन आणि पंजाब किंग्जचा अथर्व तायडे असे रिटायर्ड आऊट झाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.