ajit agarkar  saam tv
Sports

Ajit Agarkar Challenges: नवा कर्णधार अन् योग्य संघाची निवड; Chief Selector अजित आगरकरसमोर 'ही' आहेत मोठी आव्हानं

Ajit Agarkar: अजित आगरकरला संघाची निवड करण्यासह आणखी काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत

Ankush Dhavre

Team India Chief Selector: बीसीसीआयने मंगळवारी(४ जून) एक मोठा निर्णय घेतला आहे. माजी भारतीय खेळाडू अजित आगरकरची चिफ सिलेक्टर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

हे पद स्वीकारल्यानंतर आता अजित आगरकरला संघाची निवड करण्यासह आणखी काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत. कुठले आहेत ५ महत्वाचे निर्णय? जाणून घ्या. aas

योग्य खेळाडूंची निवड..

गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय संघातील खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे महत्वाच्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाला अनुभवी खेळाडूंची कमतरता जाणवली आहे. आता अजित आगरकरवर दुखापतग्रस्त झालेल्या खेळाडूची जागी योग्य खेळाडूची निवड करण्याची जबाबदारी असणार आहे.

टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी संघबांधणी करण्याची जबाबदारी..

भारतीय संघाला २०२४ मध्ये वर्ल्ड कप स्पर्धा खेळायची आहे. या स्पर्धेच्या दृष्टीने संघबांधणी करण्याची जबाबदारी अजित आगरकरवर असणार आहे. भारतीय संघाने २००७ मध्ये शेवटचा टी-२० वर्ल्डकप जिंकला होता.

त्यांनतर भारतीय संघ जेतेपद मिळवू शकला नाही. त्यामुळे आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धा जिंकण्यासाठी आतापासूनच योग्य खेळाडूला संघात स्थान देणं गरजेचं आहे. (Latest sports updates)

नव्या कर्णधाराची नियुक्ती करणं..

भारतीय संघासाठी हे वर्ष अतिशय महत्वाची असणार आहे. यावर्षी भारतीय संघाला आशिया चषक आणि वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा खेळायची आहे. वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघात काही मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

सर्वात मोठा बदल म्हणजे भारतीय संघाला नवा कर्णधार मिळू शकतो. भारतीय संघाचा कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार निवडण्याची जबाबदारी अजित आगरकरवर असणार आहे.

वरिष्ठ खेळाडूंची रिप्लेसमेंट..

आगामी काही मालिकांमध्ये वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. तर त्यांच्याऐवजी युवा खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. कुठल्याही खेळाडूला थेट बाहेर करता येणार नाही.

त्या खेळाडूची जागा भरून काढण्यासाठी दुसऱ्या खेळाडूला तयार करण्याची गरज आहे. त्यामुळे योग्य खेळाडूला संधी देणं, ही मोठी जबाबदारी अजित आगरकरवर असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sakhi Gokhale: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लेकीने परदेशात घेतलंय शिक्षण; आज गाजवतेय इंडस्ट्री

Maharashtra Live News Update: जरांगेंनी सरकारला इशारा दिला, त्यावर भुजबळ काय म्हणाले?

Rahud Ghat Traffic : गॅस टँकर अपघातामुळे राहुड घाटात वाहतूक कोंडी कायम; मनमाड मार्गाने वळविली वाहतूक

'अजित पवारांचं पाप देवेंद्र फडणवीसांनी लपवलं, मोदींकडून पाठिंबा' विजय पांढरेंचा खळबळजनक आरोप

Actor Death Threats : जर तुझ्या आई, बहिणीला काहीही सांगितलंस...; प्रसिद्ध अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या

SCROLL FOR NEXT