virender singh  google
Sports

Virender Singh Yadav: पुनियानंतर आणखी एका कुस्तीपटूने पद्मश्री पुरस्कार केला परत

Virender Singh Yadav Returned Padma shri Award: संजय सिंग यांची अध्यक्षपदी निवड होताच ऑलंपिक पदक विजेते खेळाडू निषेध व्यक्त करताना दिसून येत आहेत.

Ankush Dhavre

Virender Singh Returned Padma shri Award:

ब्रिजभूषण सिंग यांचे निकटवर्तीय संजय सिंग यांची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. संजय सिंग यांची अध्यक्षपदी निवड होताच ऑलंपिक पदक विजेते खेळाडू निषेध व्यक्त करताना दिसून येत आहेत.

शु्क्रवारी कुस्तीपटू बजरंग पुनियाने भारत सरकारने दिलेला पद्मश्री पुरस्कार परत देण्याचा निर्णय घेतला. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. आता २००५ उन्हाळी डेफलिंपिक सुवर्णपदक विजेता विरेंदर सिंग यांनी देखील मोठा निर्णय घेतला आहे.

संजय सिंग यांची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली याचा विरोध करण्यासाठी विरेंदर सिंग देखील बजरंग पुनियाच्या पावलांवर पाऊल ठेवलं आहे. त्यांनी पद्मश्री पुरस्कार भारत सरकारला परत केलं आहे. विरेंदर सिंग हे गूंगा पहलवान या नावाने देखील प्रसिद्ध आहेत. २०२१ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. यापूर्वी २०१५ मध्ये त्यांना मानाचा अर्जुन पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. (Latest sports updates)

साक्षी मलिकचा कुस्तीला कायमचा रामराम..

गेल्या काही महिन्यांपासून ब्रिजभूषण सिंग आणि कुस्तीपटूंमध्ये वाद सुरु आहेत. ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवडणूकीचा निकाल समोर आला असून, संजय सिंग यांचा विजय झाला आहे.

या निकालानंतर कुस्तीपटूंमध्ये नाराजी पसरली आहे. हा निकाल समोर येताच साक्षी मलिकने पत्रकार परिषद घेत, कुस्तीला कायमचा रामराम ठोकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT