Wrestling Federation of India Saam Tv
Sports

Wrestling Federation of India : UWWचा मोठा निर्णय; भारतीय कुस्ती महासंघावरील निलंबन घेतलं मागे

WFI : जागतिक कुस्ती महासंघाने मोठा निर्णय घेत भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन हटवलं आहे. त्यामुळे भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व पुन्हा मिळाले आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर बराच वाद झाला होता.

Bharat Jadhav

Wrestling Federation of India Suspension withdrawn :

युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघावरील निलंबन तात्काळ मागे घेतलं आहे. त्यामुळे भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले आहे. मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला. जागतिक कुस्ती महासंघाने मोठा निर्णय घेत भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन हटवलं आहे. त्यामुळे भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व पुन्हा मिळाले आहे. (Latest News)

भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर बराच वाद झाला होता. त्यानंतर जागतिक कुस्ती महासंघाला हस्तक्षेप करावा लागला होता. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आले होते. WFIयोग्य वेळेत निवडणूक घेण्यात अयशस्वी ठरल्यानं जागतिक कुस्ती महासंघाने गेल्या वर्षी २३ ऑगस्ट रोजी भारतीय कुस्ती महासंघावर तात्परी बंदी आणली होती.

दरम्यान निलंबनाचा आढावा घेण्यासाठी ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत युनायटेड वर्ल्ड रेसलिंग अधिकाऱ्यांनी काही अटी घालत निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला. UWW ने भारतीय कुस्ती महासंघाला त्यांच्या ऍथलीट आयोगाच्या निवडणुका पुन्हा आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. या आयोगासाठी उमेदवार सक्रिय क्रीडापटू असणे आवश्यक आहे. चार वर्षांहून अधिक काळ सेवानिवृत्त झालेला नसावा. मतदार विशेषतः खेळाडू असतील.

या निवडणुका १ जुलै २०२४ नंतर कोणत्याही वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान घेतल्या जातील. WFI ताबडतोब UWW ला लेखी गॅरंटी देईल की सर्व कुस्तीपटूंना सर्व WFI स्पर्धांमध्ये ऑलिम्पिक खेळ आणि इतर कोणत्याही प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कोणताही भेदभाव न करता भाग घेण्याची परवानगी दिली जाईल, असे आदेशात म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pranjal Khewalkar: आक्षेपार्ह चॅट, मोलकरणीचाही व्हिडिओ, मुलींना ब्लॅकमेल अन्...; प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये काय काय सापडलं? VIDEO

Raksha Bandhan 2025: राखी पौर्णिमेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?

Bigg Boss 19 Trailer: ड्रामा क्रेजी नही डेमोक्रेसी होगी...; बिग बॉसच्या घरात होणार नवे बदल, स्पर्धकांना मिळणार खास संधी

Pranjal khewalkar : खेवलकरांच्या मोबाईलमध्ये 234 अश्लील फोटो अन् व्हिडिओ, मोलकरणीचाही व्हिडिओ; चाकणकरांची खळबळजनक माहिती

Mokhada News : रस्तावर दरड पडल्याने कुर्लोद मार्ग बंद; ग्रामस्थांनी पुढाकार घेत रस्ता केला मोकळा

SCROLL FOR NEXT