alzarri joseph twitter
Sports

Alzarri Joseph: लाईव्ह सामन्यात राडा! आधी बॅट्समनला आऊट केलं, मग कॅप्टनशी भिडला अन् मग रागात... - VIDEO

West Indies vs England: वेस्टइंडीज आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात अल्जारी जोसेफचे रौद्ररुप पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

England vs West Indies, Alzarri Joseph: वेस्टइंडीज आणि इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात फुल ऑन ड्रामा पाहायला मिळाला आहे. कर्णधार क्षेत्ररक्षण सजवताना आधी गोलंदाजाशी चर्चा करतो आणि मग क्षेत्ररक्षण सजवतो.

मात्र वेस्टइंडीजचा कर्णधार शाई होपने अल्जारी जोसेफला हवं तसं क्षेत्ररक्षण सजवलं नव्हतं. त्यामुळे अल्जारी जोसेफ रागात मैदान सोडून, डगआऊटमध्ये जाऊन बसला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्टइंडीजने गोलंदाजी करताना शानदार सुरुवात केल. मॅथ्यू फोर्डने इंग्लंडला सुरुवातीच्या षटकात मोाठा धक्का दिला. त्यानंतर वेस्टइंडीजकडून तिसरे षटक टाकण्यासाठी अल्जारी जोसेफ गोलंदाजीला आला.

ज्यावेळी तो गोलंदाजीसाठी आला,त्यावेळी त्याने कर्णधार शाई होपसोबत कर्णधार शाई होपसोबत क्षेत्ररक्षण सजवण्याबाबत दिर्घकाळ चर्चा केली. या षटकातील पहिला चेंडू टाकल्यानंतरच त्याचा पारा चढला होता.

पहिला चेंडू टाकल्यापासून रागात असलेल्या अल्जारी जोसेफने गोलंदाजी करणं सुरु ठेवलं. त्याने ताशी १४८ किमी वेगाने चेंडू टाकला आणि जॉर्डन कॉक्सला बाद करत माघारी धाडलं. त्याने इतका वेगवान चेंडू टाकला, की फलंदाजाला जागेहून हलायची देखील संधी मिळाली नाही. विकेट मिळाल्यानंतर गोलंदाज जल्लोष करताना दिसतात, मात्र अल्जारी जोसेफ अजूनही रागातच होता.

हे षटक संपताच, तो एक मिनिटही मैदानात थांबला नाही. त्याने लगेच मैदान सोडलं. त्यामुळे मैदानावर वेस्टइंडीजचे १० खेळाडू शिल्लक होते. अल्जारी जोसेफ रागात डगआऊटमध्ये जाऊन बसला.

त्यानंतर हेडेन ज्यूनिअर वॉल्श त्याची रिप्लेसमेंट म्हणून मैदानात आला. १ षटकाचा खेळ झाल्यानंतर, तो पुन्हा मैदानात आला. त्यानंतर तो १२ वे षटक टाकताना दिसून आला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Somvar Upay: सोमवारच्या दिवशी शंकराचे करा 'हे' उपाय; देवी लक्ष्मी स्वतः येईल घरी

Maharashtra Live News Update: पुणेकरांसाठी पुढील ३ तास महत्त्वाचे, अति मुसळधार पावसाची शक्यता

PGCIL Recruitment: ना परीक्षा, ना मुलाखत, थेट मिळणार सरकारी नोकरी; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Marathi Serial : लोकप्रिय मराठी मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, दीड वर्षातच गाशा गुंडाळला

Red Alert : मुंबई, ठाणे रायगडला 4 तासांसाठी रेड अलर्ट | VIDEO

SCROLL FOR NEXT