Team India Saam TV
Sports

Team India News : भारतीय क्रिकेटपटूंना बोलू नये ते बोलून गेला; काडीचाही संबंध नसताना दिग्गज खेळाडू उगाच डाफरला

Andy Roberts : वेस्ट इंडिजचे दिग्गज वेगवान गोलंदाज अँडी रॉबर्ट्स यांनी भारताच्या पराभवावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Cricket News : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय संघावर सातत्याने टीका होत आहे. दरम्यान, आता वेस्ट इंडिजचे दिग्गज वेगवान गोलंदाज अँडी रॉबर्ट्स यांनी भारताच्या पराभवावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय खेळाडू अहंकारी आणि अतिआत्मविश्वास असल्याचा आरोप रॉर्बट्स यांनी केला आहे. विंडीजचे माजी वेगवान गोलंदाज रॉबर्ट्स यांनी आयपीएल आणि देशाकडून खेळण्याबाबत भूमिका मांडली आहे.

भारतीय क्रिकेटर्समध्ये अहंकार वाढला आहे. यामुळेच टीम इंडिया जगातील इतर खेळाडूंना कमी लेखत आहेत. वनडे आणि टी 20 की टेस्ट क्रिकेटवर त्यांचा फोकस आहे, हे भारताला ठरवावे लागेल, असा सल्लाही त्यांनी दिला. (Latest sports updates)

भारताकडे काही चांगले खेळाडू आहेत, पण त्यांनी भारताबाहेर चांगली कामगिरी केलेली नाही. मला अपेक्षा होती की भारताने फलंदाजीत चांगली कामगिरी करेल. फायनलमध्ये मला कोणतीही चांगली खेळी खेळाडूंकडून दिसली नाही.

रॉबर्ट्स यांनी भारताचा टॉप ऑर्डरचा कसोटी गोलंदाज आणि ऑफस्पिनर आर अश्विनला न खेळवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. अश्विनला वगळणे हास्यास्पद होते. तुम्ही तुमच्या सर्वोत्तम स्पिनरला का खेळवलं नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

SCROLL FOR NEXT