viral cricket video twitter
क्रीडा

Viral Cricket Video: अलग स्टाईल है मेरा..! या गोलंदाजाची ॲक्शन पाहून तुम्हीही चक्रावून जाल

Weird Action In Cricket: आगळ्या वेगळ्या गोलंदाजी अॅक्शनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

प्रत्येक गोलंदाजाची गोलंदाजी अॅक्शन ही हटके असते. आतंरराष्ट्रीय स्तरावर गेल्यानंतर गोलंदाज आपल्या अॅक्शनमुळे ओळखला जातो. काही गोलंदाजांची अॅक्शन इतकी हटके असते की, फलंदाज कन्फ्युज होऊन जातात. ज्यात लसिथ मलिंगा, मुथय्या मुरलीधरन, पॉल अॅडम्स आणि सोहेल तनविरसारख्या गोलंदाजांचा समावेश आहे. आम्ही या गोलंदाजांचा उल्लेख करतोय, सोशल मीडियावर आगळ्या वेगळ्या स्टाइलने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता,की गोलंदाज हटके स्टाइलने गोलंदाजी करताना दिसतोय. गोलंदाजाची अॅक्शन जितकी सोपी तितकी चांगली असं म्हणतात. कारण दुखापतग्रस्त होण्याची शक्यता कमी होऊन जाते. मात्र अॅक्शन किचकट असेल, तर गोलंदाज दुखापतग्रस्त होण्याची शक्यता वाढते.

उजव्या हाताचा गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतो त्यावेळी त्याचा उजवा पाय पुढे जात असतो. मात्र या गोलंदाजाचा डावा पाय समोर जातोय. ही आगळी वेगळी अॅक्शन पाहून नेटकरीही चक्रावून गेले आहेत. या व्हिडिओवर नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

हा व्हिडिओ sehellupnduwa या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर ३० हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत. एका युजरने या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत फादर ऑफ सोहेल तनविर असं लिहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Exit Poll: सोलापूर दक्षिण मतदारसंघातून कोण होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Buldhana Vidhan Sabha : महायुतीच्या उमेदवारांकडून धमक्या; मविआकडून पोलिसात तक्रार, सुरक्षा देण्याची मागणी

Saam Exit Poll : अजित पवार की शरद पवार, चिपळूणमध्ये कौल कुणाला? एक्झिट पोल कुणाच्या बाजूने? VIDEO

Pune Cantonment Exit Poll : पुणे कॅन्टोनमेंटमध्ये रमेश बागवे आमदार होणार? पाहा Exit Poll

World Travel : स्वित्झर्लंडपेक्षा लय भारी भारतातील 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT