Wayne Parnell In RCB Reece Topley's Replacement: आयपीएल २०२३ स्पर्धेतील नवव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात कोलकाता रायडर्स संघातील खेळाडूंनी जोरदार कामगिरी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर ८१ धावांनी विजय मिळवला होता.
या पराभवासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला आणखी एक मोठा बसला होता. संघातील वेगवान गोलंदाज रिस टोपली दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. तर त्याच्या जागी आता नव्या खेळाडूची एंट्री झाली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील वेगवान गोलंदाज रिस टोपली हा खांद्याच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२३ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. क्लब क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या वृत्तानुसार, रिस टोपलीची रिप्लेसमेंट म्हणून दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज वॅन पार्नेलची निवड करण्यात आली आहे. वॅन पार्नेल हा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज असून तो फलंदाजी करण्यासाठी देखील ओळखला जातो.
आयपीएल २०२३ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने त्याला १.९ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने २ षटकात १४ धावा खर्च करत १ गडी बाद केला. (Latest sports updates)
तर वॅन पार्नेल बद्दल सांगायचं झालं तर त्याला आयपीएल स्पर्धेत खेळण्याचा अनुभव आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्स आणि पुणे वॉरियर्स इंडिया या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. तर गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर त्याने २६ टी-२० सामन्यांमध्ये २६ गडी बाद केले आहेत.
तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मुंबई इंडियन्स संघाला ८ गडी राखून पराभूत केले होते. या जोरदार कामगिरीनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ जोरदार फॉर्ममध्ये परतला आहे असे वाटत असताना दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे.
गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला ८१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.