Virat visits Dhoni house saam tv
Sports

IND vs SA: रांची वनडेपूर्वी धोनीच्या घरी पोहोचला विराट; स्वतः माहीने चालवली कार

Virat visits Dhoni house: रांचीमध्ये होणाऱ्या ओडीआय सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक खास क्षण घडला. टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली थेट महेंद्रसिंग धोनी यांच्या घरी पोहोचला.

Surabhi Jayashree Jagdish

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टेस्ट सिरीजनंतर आता वनडे सिरीज सुरु होणार आहे. तीन सामन्यांची वनडे सिरीज रविवारी JSCA आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणार आहे. मात्र सिरीजच्या तयारीदरम्यान रांचीमध्ये घडलेल्या एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

विराट कोहली, ऋषभ पंत आणि ऋतुराज गायकवाड यांनी गुरुवारी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची त्याच्या घरी भेट दिली. या भेटीने सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आणि सिरीजच्या तयारीला एक इमोशनल रंग मिळाला.

कोहली-धोनीची पुन्हा झलक

धोनीच्या घरी कोहली पोहोचल्यावर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. यामागे कारणंही तसं ठोस होतं. कोहली आणि धोनी यांनी भारतीय क्रिकेटला अनेक आनंदाचे आणि क्षण दिले आहेत. कोहलीने धोनीच्या नेतृत्वाखाली प्रगती केली तर धोनीने निर्णायक क्षणी कोहलीवर विश्वास ठेवला. रांचीमध्ये पुन्हा एकदा त्यांचं मैत्रीपूर्ण नातं दिसून आलं. यावेळी कोहली आणि धोनीचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

चाहत्यांना भारावून टाकणारा क्षण

खऱ्या अर्थाने चाहत्यांना आनंद देणारा क्षण म्हणजे भेटीनंतर धोनीने स्वतः कार चालवत कोहलीला सोबत नेलं. कारमध्ये धोनी स्टेअरिंगवर आणि बाजूला बसलेला कोहली चाहत्यांना हात हलवून बाय करताना दिसला. यावेली रस्त्यावर जमलेल्या चाहत्यांनी आनंदाने जल्लोष केला. हा व्हिडिओ काही मिनिटांतच सोशल मीडियावर पसरला आणि चाहत्यांना त्यांच्या एकत्र खेळाच्या काळाची आठवण करून दिली.

पंत आणि गायकवाडची भेट

दुसरीकडे पंत आणि गायकवाड यांनीही धोनीला भेट दिली. टीम इंडिया रांचीमध्ये खेळायला आली की खेळाडू धोनीला भेट देतात. पंतने धोनीला नेहमीच मार्गदर्शक मानलंय. गायकवाड हा धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स टीमचा महत्त्वाचा भाग आहे. यावेळी धोनीने ऋतुराजशीही चर्चा केली

ही भेट भारतीय संघासाठी महत्त्वाच्या क्षणी झाली. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर अनुपस्थित असताना KL राहुल वनडे संघाचं नेतृत्व करणार आहे. टेस्ट सिरीजमधील निराशाजनक कामगिरीनंतर टीमला लवकर कमबॅक करणं आवश्यक आहे. कोहली वनडे टीममध्ये परतला असून भारताच्या फलंदाजीला एक आधार मिळणार आहे.

पहिला वनडे सामना धोनीच्या रांचीमध्ये होत असल्याने ही भेट चाहत्यांसाठी आणि खेळाडूंसाठी विशेष ठरली. सिरीजची सुरुवात दमदार करण्यासाठी धोनीने दिलेला इमोशनल सपोर्ट आणि त्याने कोहलीला रांचीच्या रस्त्यांवरून स्वतः कार चालवत नेलेला क्षण टीमसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत भाजच्या ३ बड्या नेत्यांची हकालपट्टी, पक्षविरोधी काम केल्याचा ठपका

Crime: ६५ वर्षीय महिलेची हत्या, नंतर मृतदेहावर बलात्कार; २४ वर्षांच्या तरुणाचं हैवानी कृत्य

Bank Loan: कर्ज घ्यायचंय? तर कॅरेक्टर ठेवा चांगलं; सिबिलसह तपासलं जाणार तुमचा गुन्हेगारी रेकॉर्ड

Gold Rate Today: सोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, आजचा भाव काय? वाचा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे ताजे दर

Gas Leak Safety: घरात गॅसचा वास येत असेल तर, 'या' ५ चुका करू नका, मोठा स्फोट होईल

SCROLL FOR NEXT