virat kohli
virat kohli twitter
क्रीडा | IPL

Virat Kohli Records: 'किंग कोहलीचा दरारा! काल पण आणि आज पण..,शतकी खेळी करत मोडले 'हे' रेकॉर्डस्..

Ankush Dhavre

Virat Kohli Century: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ६५ वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर केवळ आणि केवळ एकाच नावाचा गजर झाला तो म्हणजे किंग कोहलीच्या नावाचा.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी अतिशय महत्वाच्या असणाऱ्या सामन्यात विराटने शतकी खेळी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला ८ गडी राखून विजय मिळवून दिला.

या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. दरम्यान शतकी खेळीसह त्याने अनेक मोठ मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी १८७ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने ४ षटकार आणि १२ चौकारांच्या साहाय्याने १०० धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने काही रेकॉर्डस् मोडून काढले आहेत.

या विक्रमांना घातली गवसणी..

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी उभारला धावांचा डोंगर..

विराट कोहली हा २००८ पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याने या संघासाठी खेळताना आयपीएल स्पर्धेत ७,५०० धावा पूर्ण केल्या आहेत. असा कारनामा करणारा तो एकमेव फलंदाज ठरला आहे.

आयपीएल २०२३ स्पर्धेत जोरदार कामगिरी...

सुरू असलेल्या हंगामात विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याने आयपीएल २०२३ स्पर्धेत जोरदार कामगिरी करत ५०० धावा पूर्ण केल्या आहेत.

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक शतके..

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम हा ख्रिस गेलच्या नावे आहे. ख्रिस गेलच्या नावे आयपीएल स्पर्धेत ६ शतके झळकावण्याची नोंद आहे. आता विराट कोहलीने याबाबतीत ख्रिस गेलची बरोबरी केली आहे. विराटने देखील ६ शतके झळकावली आहेत. तर विराट कोहली हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. (Latest sports updates)

सहा हंगामात ५०० पेक्षा अधिक धावा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी विराट कोहली गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चांगली कामगिरी करतोय. आधी कर्णधार म्हणून त्याने संघाची जबाबदारी पार पाडली. आता फलंदाज म्हणून तो संघासाठी मोलाचे योगदान देत आहे. त्याचा जोरदार फॉर्म आयपीएल २०२३ स्पर्धेत देखील सुरूच आहे. त्याने या हंगामात ५०० धावा पूर्ण केल्या आहेत. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात तो एकमेव भारतीय फलंदाज आहे ज्याने ६ वेळेस आयपीएल स्पर्धेत ५०० धावा पूर्ण केल्या आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा जोरदार विजय..

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करत असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाकडून हेन्री क्लासेनने सर्वाधिक १०४ धावांची खेळी केली. तर या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक १०० धावांची खेळी केली. तर डू प्लेसिस ७१ धावा करून माघारी परतला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : रत्नागिरी- दिवा पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनमध्ये बिघाड

Heat Wave in Maharashtra : मे महिना 'ताप'दायक ठरणार, राज्यात उष्णतेची लाट येणार

Andheri Fire: ब्रेकिंग! अंधेरी पंप परिसरात भीषण अग्रितांडव; दारूचे दुकान जळून खाक

Patients Relatives Beaten Nurse: वॉर्डमधून बाहेर काढल्याने राग आला; रुग्णासहित नातवाईकांकडून नर्सला मारहाण

Petrol Diesel Rate 2nd May 2024: पुण्यात पेट्रोल महागलं अन् डिझेल स्वस्त झालं; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

SCROLL FOR NEXT