IND VS AUS WTC FINAL 2023 LIVE: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे. ओव्हलच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ४६९ धावा केल्या आहेत.
या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. रोहित, गिल पाठोपाठ विराट देखील स्वस्तात बाद होऊन माघारी परतला आहे.
स्टार्कने घेतली विराटची विकेट..
विराट कोहली हा भारतीय संघातील अनुभवी फलंदाज आहे. मोठ्या धावांचा डोंगर सर करताना विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. तो ३१ चेंडूंचा सामना करत १४ धावा करत माघारी परतला. विराट स्वरूपात भारतीय संघाला चौथा धक्का बसला.
तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना १९ वे षटक टाकण्यासाठी मिचेल स्टार्क गोलंदाजीला आला होता. त्यावेळी विराट कोहली १४ धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी मिचेल स्टार्कने बाउन्सर चेंडू टाकला.
जो उसळी घेत बाहेरच्या दिशेने गेला. विराटने हा चेंडू डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटचा कडा घेत स्लिपमध्ये असलेल्या स्टीव्ह स्मिथच्या हातात गेला. स्मिथने कुठलीही चूक न करता हा झेल टिपला. विराटच्या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. (Latest sports updates)
ऑस्ट्रेलियाने उभारला ४६९ धावांचा डोंगर..
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला धक्के दिले.
मात्र त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि हेडने मोठी भागीदारी करत भारतीय संघाला कमबॅक करून दिलं. या डावात स्टीव्ह स्मिथने १२१ धावांची खेळी केली.
तर हेडने १६३ धावांचे योगदान दिले. तर अॅलेक्स कॅरीने ४८ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.