Video: गाणं वाजलं अन् मैदानातच झाला सुरु, कोहलीचा 'विराट' डान्स व्हायरल Saam TV
Sports

Video: गाणं वाजलं अन् मैदानातच झाला सुरु, कोहलीचा 'विराट' डान्स व्हायरल

ICC T20 विश्वचषक 2021 च्या 33 व्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने बुधवारी अफगाणिस्तानचा 66 धावांनी पराभव केला.

वृत्तसंस्था

ICC T20 विश्वचषक 2021 च्या 33 व्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने बुधवारी अफगाणिस्तानचा 66 धावांनी पराभव केला. या विजयानंतर भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम आहे. अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर दिवाळीच्या मुहूर्तावर भारतीय फलंदाजांनी चमकदार कामगिरी करत 20 षटकांत 2 गडी गमावून 210 धावा केल्या आणि त्यानंतर अफगाणिस्तानला 7 बाद 144 धावांवर रोखले.

या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली फलंदाजीसाठी आला नाही, मात्र क्षेत्ररक्षणादरम्यान त्याने आपल्या डान्सने चाहत्यांची मनं जिंकली. प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा (74) आणि लोकेश राहुल (69) यांच्या अर्धशतकांच्या बळावर भारताने दोन बाद 210 धावांची मजल मारली.

निर्धारित 20 षटकात अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. 144 धावांवर रोखले. भारताचा तीन सामन्यांमधला हा पहिला विजय असून स्पर्धेतील उपांत्य फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशा अजूनही जिवंत आहेत. भारताचा निव्वळ रन रेट आता +0.073 आहे आणि संघ चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. संघाचा आता पुढील सामना स्कॉटलंडविरुद्ध आज खेळालला जाणार आहे. अफगाणिस्तानला चार सामन्यांत दुसरा पराभव पत्करावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घराच्या कोपऱ्यात लपलेला तब्बल १२ फूट अजगर; व्हिडिओ पाहून शहारे येतील

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Aamir Khan : बॉलिवूडमध्ये खळबळ! आमिर खानच्या घरी एकाचवेळी २५ आयपीएस अधिकारी धडकले, नेमकं प्रकरण काय?

UPI Rules: UPI वापरात मोठा बदल! १ ऑगस्टपासून ५ नवे नियम; थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

Daily Shravan Remedies : श्रावणात रोज नक्की करा हे ५ उपाय; मिळेल सुख, शांती आणि आर्थिक स्थैर्य

SCROLL FOR NEXT