virat kohli  Twitter
Sports

Virat Kohli: 'नाटु नाटु' वर विराटचा भन्नाट डान्स , बेधुंद होऊन नाचतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल- VIDEO

Virat Kohli Naatu Naatu dance: विराटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

Ankush Dhavre

Ind Vs Aus, 1st ODI: सध्या भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान सामना सुरु होताच विराटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली जेव्हा फलंदाजी करत असतो त्यावेळी तो चौकार आणि षटकार मारून चाहत्यांचे मनोरंजन करत असतो.

मात्र जेव्हा तो क्षेत्ररक्षण करण्यासाठी येतो त्यावेळी तो आपल्या डान्सने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो.

नाणेफेक जिंकत हार्दिक पंड्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळी भारतीय संघातील खेळाडू क्षेत्ररक्षण करण्यासाठी आले.

त्यावेळी विराट कोहलीला पहिल्या स्लिपला क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी विराट कोहली नाटु नाटु गाण्यावरील डान्स स्टेप करताना दिसून आला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११ :

ऑस्ट्रेलिया संघ -

ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श,स्टिव्ह स्मिथ (कर्णधार),मार्नस लॅबुशेन,जोश इंग्लिस,ग्लेन मॅक्सवेल,कॅमरन ग्रीन, मार्कस स्टॉयनिस, शॉन एबॉट, मिशेल स्टार्क,अॅडम झम्पा

भारतीय संघ-

शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव , मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli : तहसीलदारांच्या खुर्चीवर फेकले सडलेले सोयाबीन; हिंगोली, सेनगाव तालुके वगळल्याने शेतकरी आक्रमक

Political News : निवडणुकीपूर्वी NDA ला मोठा झटका, बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Thane To Ganpatipule: ठाणेहून गणपतीपुळ्यापर्यंतचा निसर्गरम्य प्रवास कसा कराल? वाचा प्रवासाचा वेळ, अंतर आणि ट्रॅव्हल गाईड

Heart Attack Women: महिलांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढला; वेळीच जाणून घ्या हे Facts, अन्यथा...

Maharashtra Live News Update: अतिवृष्टीची मोजणी करण्यासाठी स्कायमेट कुठून शेतकऱ्यांची दिशाभूल

SCROLL FOR NEXT