विराट कोहली हा भारतातील सर्वात लोकप्रिय असलेला खेळाडू आहे. त्याची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या लोकप्रियतेचा फायदा घेत काही मिडिया हाउस त्याच्या खोट्या बातम्या प्रसारित करत आहेत.
काही दिवसांपूर्वी विराट कोहलीला इंस्टाग्रामवर १ पोस्ट शेअर करण्यासाठी ११.४५ कोटी रुपये मिळतात अशी बातमी दाखवली गेली होती. मात्र विराटने स्वत: ट्विट करत ही बातमी खोटी असल्याचे म्हटले होते. आता विराटने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत एका प्रसिद्ध मीडिया हाउसला फटकारले आहे.
विराट कोहली हा इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केला जाणारा क्रिकेटपटू आहे. इंस्टाग्रामवर त्याचे २५७ मिलियन फॉलोवर्स आहेत. आता इंस्टाग्रामवर त्याने एका प्रसिद्ध मीडिया हाउसच्या बातमीचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे, ज्यावर त्याने कॅप्शन म्हणून लिहीले की, 'लहानपणापासून जो वृत्तपत्र वाचतोय, तो देखील खोट्या बातम्या द्यायला लागला आहे'
विराट कोहलीची ही इंस्टाग्राम स्टोरी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही स्टोरी व्हायरल होताच नेटकऱ्यांनी देखील भन्नाट प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे. प्रसिद्ध मीडिया हाउसने असा दावा केला होता की, विराट कोहली आणि अनुष्का शर्माने अलिबागमध्ये ८ एकर जमिनीवर फार्महाऊस बनवण्यासाठी तब्बल १९.२४ कोटींची गुंतवणूक केली आहे. तसेच दुसर्या एका मीडिया हाऊसचा हवाला देऊन, अहवालात पुढे नमूद केले आहे की विराट या मालमत्तेवर क्रिकेट खेळपट्टी बांधण्यास उत्सुक होता. (Latest sports updates)
इंस्टाग्रामवरून कोट्यावधी रूपये कमावण्याची बातमी खोटी..
विराट कोहली हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो आपल्या दैनंदिन जीवनातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असतो. काही मिडिया हाऊसने अला दावा केला होता की, विराट कोहलीला इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यासाठी ११.४५ कोटी रुपये मिळतात. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर पसरली होती.
त्यानंतर विराटने स्वत: ट्विट करत या सर्व अफवा असल्याचे म्हटले होते. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहीले होते की, ' 'मला आयुष्यात जे काही मिळालं आहे त्याचा मी आभारी आहे. सोशल मीडियावर माझ्या कमाईच्या बाबतीत अनेक बातम्या सुरू आहेत. मात्र त्या सर्व खोट्या आहेत. '
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.