Virat Kohli creates history against West Indies with his 55th ODI century 
Sports

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Virat Kohli Creates History : विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध ५५वे वनडे शतक झळकावत १५ हजार धावांचा टप्पा गाठला. या खेळीत कोहलीने सचिन तेंडुलकरशी संबंधित दोन मोठे विक्रम मागे टाकले.

Bharat Jadhav

  • विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध ५५वे वनडे शतक झळकावत इतिहास रचला

  • कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये १५,००० धावांचा टप्पा पार केला

  • कोहलीचे ५५वे वनडे शतक ७४ चेंडूत पूर्ण

एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना विराट कोहलीने पुन्हा एकदा विक्रमांच्या यादीत आपले नाव कोरले. एकदिवसीय क्रिकेटमधील आपले पुनरागमन अविस्मरणीय करण्यासाठी विराट कोहलीने तुफान फलंदाजी केली. जुलै महिन्यानंतर आपला पहिलाच एकदिवसीय सामना खेळताना, कोहलीने तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार शतक झळकावले. कोहलीने वादळी फलंदाजीचे दर्शन घडवत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ५५ वे दिमाखदार शतक झळकावले. षटकार खेचून पूर्ण केलेल्या या शतकी खेळीसह कोहलीने अनेक जागतिक विक्रम मोडीत काढले.

सामन्यात विजयासाठी मिळालेल्या २९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची पहिली विकेट ७४ धावांवर पडली. त्यानंतर कोहली मैदानात उतरला. त्याने अवघ्या ४० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि कर्णधार शुभमन गिल (११०) सोबत दुसऱ्या विकेटसाठी १५१ धावांची निर्णायक शतकीय भागीदारी रचून संघाला भक्कम स्थितीत आणले. अर्धशतक झळकावून कोहलीने सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम मोडलाय. या खेळीदरम्यान त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५,००० धावांचा टप्पा गाठलाय.

ही कामगिरी करणारा तो जगातील केवळ दुसरा फलंदाज ठरला. सचिन तेंडुलकरला मागे टाकत एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद गतीने १५,००० धावा पूर्ण करण्याचा विक्रमही विराटनं आपल्या नावावर केलाय. या खेळीदरम्यान त्याने दोन महत्त्वाचे टप्पे गाठले. आशियाबाहेरील संघांविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये ५० किंवा त्याहून अधिक धावांच्या सर्वाधिक खेळींच्या बाबतीत कोहलीने सचिन तेंडुलकरला मागे टाकले. यासह त्याने ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये १५,००० धावांचा टप्पाही ओलांडला.

विराटची ४० चेंडूंत अर्धशतकी खेळी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात, कोहलीने सुरुवातीपासूनच आपल्या शैलीची झलक दाखवली. त्याने विकेट्सच्या दरम्यान वेगाने धावून आणि मोकळ्या जागांचा (गॅप्सचा) अचूक वापर करून धावांची उभारणी केली. कोहलीने अवघ्या ४० चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले.

२७ व्या षटकात अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर षटकार मारून त्याने हा टप्पा गाठला. या अर्धशतकासह, आशियाबाहेरील संघांविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा ५० किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम कोहलीने मोडला. आता कोहलीच्या नावावर आशियाबाहेरील संघांविरुद्ध ५० किंवा त्याहून अधिक धावांच्या ९६ खेळींची नोंद झालीय.

एकदिवसीय सामन्यांमध्ये १५,००० धावांचा टप्पा गाठला

विराट कोहलीच्या या अर्धशतकी खेळीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे एकदिवसीय (ODI) क्रिकेटमध्ये १५,००० धावांचा टप्पा पूर्ण करणे. ५९ धावांवर पोहोचताच त्याने ही कामगिरी साध्य केली. असे करून, एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५,००० धावांचा टप्पा गाठणारा तो सचिन तेंडुलकरनंतरचा जगातील केवळ दुसरा फलंदाज ठरला.

सचिनचा विक्रम मोडीत काढत, सर्वात कमी डावांमध्ये हा टप्पा गाठण्याचा विक्रमही त्याच्या नावावर जमा झाला आहे; जिथे सचिनला १५,००० एकदिवसीय धावा पूर्ण करण्यासाठी ३७७ डाव लागले होते, तिथे कोहलीने ही कामगिरी केवळ ३०३ डावांमध्ये करून दाखवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

ज्ञानेश कुमारांकडून भाजपच्या तिकीटाची ऑफर; केरळच्या माजी सचिवांचा खळबळजनक दावा

दोन दिवस शांत राहा अन् शिव्या खा! माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा कार्यकर्त्याला सल्ला

राजकीय वर्तुळात पितृपक्ष सुरू; भाजप, राष्ट्रावादीसह अनेक राजकीय पक्षांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT