Virat Kohli saam tv
Sports

Video: आधी सिराजने डिवचले, मग विराटने खांदा मारला, १९ वर्षीय ऑस्ट्रेलियन फलंदाजानं दिलं बॅटने उत्तर, पाहा व्हिडीओ

Virat Kohli : ओपनर नॅथन मॅकस्विनीच्या जागी 19 वर्षीय सॅम कॉन्स्टन्सने डेब्यू केलं. या नवख्या खेळाडूने जसप्रीत बुमराहच्या नाकीनऊ आणल्या. अशातच विराट कोहली या खेळाडूला भिडल्याचं पाहायला मिळालं.

Surabhi Jayashree Jagdish

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर बॉक्सिंग डे टेस्ट खेळवली जातेय. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंसने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन टीमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. ओपनर नॅथन मॅकस्विनीच्या जागी 19 वर्षीय सॅम कॉन्स्टन्सने डेब्यू केलं. या नवख्या खेळाडूने जसप्रीत बुमराहच्या नाकीनऊ आणल्या. अशातच विराट कोहली या खेळाडूला भिडल्याचं पाहायला मिळालं.

सॅम कॉन्स्टन्सशी भिडला विराट

ऑस्ट्रेलियाच्या डावातील दहाव्या ओव्हरनंतर मेलबर्न क्रिकेट मैदानावरील वातावरण काहीसं तापलेलं दिसलं. सॅम कॉन्स्टन्स आणि विराट कोहली यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. भर मैदानात कोहलीने कॉन्स्टन्सला धक्का दिला. यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये वाद सुरू झाला.

प्रकरण शांत करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दुसरा ओपनर उस्मान ख्वाजासह अंपायरला देखील यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान विराटपूर्वी गोलंदाज मोहम्मद शमीने देखील या खेलाडूला डिवचलं होतं.

ICC करणार तपासणी

दरम्यान आता विराट कोहलीने हे जाणूनबुजून केलं की नकळत त्याच्याकडून ही गोष्ट घडली याची चौकशी आयसीसी करणार आहे. आता या प्रकरणाबाबत कोणताही निष्कर्ष काढण्यासाठी ICC प्रथम घटनेची चौकशी करणार आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या म्हणण्यानुसार, चूक विराट कोहलीची आहे. त्यामुळे आता विराट कोहलीला दंड बसणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

बुमराहवर भारी पडला नवखा खेळाडू

या सामन्यात सॅम कॉन्स्टन्सने स्फोटक फलंदाजी केली. पहिल्या 18 बॉल्समध्ये त्याने केवळ २ रन्स केले होते. मात्र जसप्रीत बुमराहविरुद्ध त्याने त्याच्या फलंदाजीची शैली दाखवली. बुमराहच्या चौथ्या ओव्हरमध्ये कॉन्स्टन्सने पहिल्या दोन बॉलवर एक चौकार आणि एक सिक्स ठोकला. या ओव्हरमध्ये एकूण 14 रन्स आले. 11व्या ओव्हरमध्ये त्याने 18 रन्स केले. त्यात एक सिक्स आणि दोन फोरचा समावेश होता.

सॅम कॉन्स्टन्सने 52 बॉल्समध्ये अर्धशतक पूर्ण केलं. यावेळी त्याने 5 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. मात्र, तो 60 रन्सची इनिंग खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. स्पिनर गोलंदाज रवींद्र जडेजाने त्याची विकेट काढली. ऑस्ट्रेलियासाठी टेस्टमध्ये अर्धशतक झळकावणारा कॉन्स्टन्स हा दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Shivaji: हातात भगवा, नजरेत ज्वाला…; शिवजयंतीनिमित्त रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाची दमदार झलक समोर

Maharashtra Live News Update : . लालपरी मधील प्रवासी सीटच गायब.. बुलढाण्याहून अकोलाकडे जाणाऱ्या बसमधील प्रकार

Kolhapur News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अश्लील डान्स|Video Viral

Mumbai Local News : रेल्वे प्रवाशांना लागणार शिस्त; अपघाताचं प्रमाण होणार कमी, काय आहे रेल्वे प्रशासनाचा नवा उपक्रम?

Anjeer Barfi Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग बनवून ठेवा टेस्टी आणि हेल्दी अंजीर बर्फी, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT