टी-20 विश्वचषकापूर्वीच (T-20 World Cup) भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) विश्वचषकानंतर टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र टी-20 विश्वचषकात संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर विराट कोहली वनडे कर्णधारपदही गमावणार हे जवळपास निश्चित झाले होते. BCCI नं तसे बुधवारी जाहिर केले. बीसीसीआयने विराट कोहलीला भारताच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवून रोहित शर्माकडे (Rohit Sharma) कर्णधारपद सोपवले आहे.
वृत्तानुसार, बीसीसीआयने विराट कोहलीला स्वेच्छेने वनडे संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्यासाठी 48 तासांचा अवधी दिला होता. मात्र विराटने 48 तासांत कर्णधारपदाचा राजीनामा दिला नाही. यानंतर, 49 व्या तासात, विराट कोहलीने एकदिवसीय कर्णधारपद गमावले. त्याच्या जागी रोहितला वनडेचे कर्णधार बनवण्यात आले आहे. आता कोहलीकडे फक्त भारतीय संघाच्या कसोटी संघाची जबाबदारी आहे.
बीसीसीआयच्या निवेदनात कोहलीला पायउतार करण्यात आल्याचा उल्लेख देखील नाही. बीसीसीआयच्या निवेदनात म्हटले आहे की निवड समितीने रोहितला वनडे आणि टी-२० संघाचा आंतरराष्ट्रीय कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय आणि राष्ट्रीय निवड समितीने कोहलीला कर्णधारपदावरून हटवले. समितीला एकदिवसीय आणि टी-20 साठी कर्णधार हवा आहे जेणेकरून 2022 टी-20 विश्वचषक आणि 2023 विश्वचषकाची चांगली तयारी करता येईल.
टी-20 विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजमधून भारत बाहेर पडला तेव्हाच कोहलीला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना गेली साडेचार वर्षे संघाच्या कर्णधार असलेल्या कोहलीला सन्मानजनक पदावरुन हटवायचे होते. शेवटी असे दिसले की कोहलीला बीसीसीआयने कर्णधार पदावरुन हटवले. कोहलीच्या कर्णधारपदाचा काळ ही एक अद्भुत कथा आहे. महेंद्रसिंग धोनीने कोहलीला आपल्या नेतृत्वाखाली तयार केले आणि नंतर कसोटी संघाची जबाबदारी कोहलीच्या खांद्यावर दिली. पुढचे दोन वर्ष कोहलीने संघाचा जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. पुढे विराटवर खेळाडूंचा विश्वास बसला नाही आणि कर्णधार म्हणून त्याला पायउतार व्हावे लागले.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.