virat kohli saam tv
Sports

Virat Kohli Salary: विराटच्या सॅलरीतून ८ कोटी कापणार; हातात १३ कोटी येणार; कारण..

Tax On Virat Kohli Salary: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या सॅलरीतून १३ कोटी रुपये कापले जाणार आहेत. यामागचं नेमकं कारण काय?

Ankush Dhavre

विराट कोहली हा केवळ भारतीय क्रिकेटमधील नव्हे, तर आंतरराष्ट्री क्रिकेटमधील एक दिग्गज खेळाडू आहे. विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून उदयास आला आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुन विराट कोहलीला आपल्या संघात स्थान दिलं. त्यानंतर आता १८ वा सिझन सुरु आहे.

विराट याच संघाकडून खेळतोय. वर्षानुवर्षे त्याची सॅलरी वाढतच चालली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, विराट कोहली या हंगामात खेळण्यासाठी २१ कोटी रुपये मानधन घेतोय. मात्र त्याला पूर्ण पगारातून केवळ १३ कोटी रुपये मिळणार आहेत. तर ८ कोटी रुपये वजा केले जाणार आहेत. यामागचं कारण काय? तर जाणून घ्या.

माध्यमातील वृत्तानुसार, विराट कोहलीला २००८ ते २०१० या कालावधीत १२ लाख रुपये इतके मानधन दिले जात होते. त्यानंतर विराटने भारतीय संघासाठी दमदार कामगिरी केली. त्याची लोकप्रियता वाढत गेली. त्यामुळे त्याच्या मानधनात झपाट्याने वाढत गेली. विराट सध्या २१ कोटी रुपये मानधन घेतोय. तर २०११-१३ मध्ये त्याच्या मानधनाचा आलेख उंचावला होता. या कालावधीत त्यने ८.२८ कोटी रुपये इतकं मानधन घेतलं होतं.

विराट कोहलीची कमाई ही कोटींमध्ये आहे. त्यामुळे तो आयकर स्लॅबमध्ये येतो. नव्या नियमानुसार, १२ ते १५ लाख उत्पन्न असलेल्यांवर २० टक्के ,तर १५ लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्यांवर ३० टक्के कर आकारला जातो. त्यामुळे विराट १५ लाखांहून अधिकच्या श्रेणीत येतो.

विराटला या हंगामासाठी २१ कोटी रुपये मानधन दिले जात आहेत. त्यामुळे ३० टक्के करानुसार, ६.२ कोटी रुपयांचा कर द्यावा लागतो. मात्र ५ कोटींपेक्षा अधिक कमाईवर २५ टक्के अधिभार लावला जातो.

त्यामुळे ६.३ कोटींवर १.५७५ कोटी. ६.३ कोटींवर ४ टक्के उपकर म्हणजे ३१ लाख रुपये होतात. हे तिन्ही कर मिळून विराटला जवळपास ८.१९ कोटी रुपये कर द्यावा लागेल. त्यामुळे विराटचं मानधन २१ कोटी रुपये असूनही त्याच्या हातात कापून १२.८१ कोटी रुपये येतील. तर ८.१९ कोटी रुपये वजा होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Flag Boys: तुमच्या बॉयफ्रेंडच्याही अशा सवयी असतील तर वेळीचं व्हा सावध, नाहीतर आयुष्यभर रडालं

Maharashtra Live News Update: रायगडच्या श्रीवर्धनमध्ये पुण्यातील पर्यटकांच्या थार जीपने एकाला चिरडलं

Thursday Horoscope: मनोबल वाढेल, ४ राशींना नोकरीत यश मिळेल, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Bajra Dhapate Recipe : नाश्त्याला काय? फक्त १० मिनिटांत बनवा खमंग - पौष्टिक बाजरीचे धपाटे

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; अमृतांजन पुलाच्या खांबाला धडकून ट्रकचा चक्काचूर, केबिनमध्ये अडकला ड्रायव्हरचा मृतदेह

SCROLL FOR NEXT