IND vs AUS, Virat Kohli duck  Saam TV Marathi
Sports

IND vs AUS : विराटसोबत ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच असं झालं, कुणाला विश्वासही बसणार नाही

IND vs AUS, Virat Kohli duck : सात महिन्यानंतर मैदानावर परतणाऱ्या विराट कोहलीच्या बॅटची जादू चालली नाही. पर्थ कसोटीत विराट कोहली भोपळाही न फोडता बाद झाला.

Namdeo Kumbhar

Virat Kohli, India vs Australia : किंग विराट कोहली सात महिन्यानंतर मैदानावर परतला. विराटची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते डोळ्यात तेल टाकून बसले होते. पण चाहत्यांच्या पदरी घोर निराशा पडली. कारण, पर्थ वनडे सामन्यात विराट कोहलीला खातेही उघडता आले नाही. मिचेल स्टार्कच्या चेंडूवर विराट कोहली शून्यावर बाद झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने मिचेल स्टार्कसमोर आठव्यांदा सरेंडर केलेय. (Virat Kohli duck against Australia ODI record)

२२३ दिवसानंतर मैदानावर परतला, पण....

२२३ दिवसानंतर विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला. भारतीय चाहत्यांना त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. पण किंग शून्यावर बाद झाला अन् सर्वांच्या पदरी घोर निराशापडली. विराट कोहलीला ८ चेंडूवर एकही धाव काढता आली नाही, तो स्टार्कच्या चेंडूवर स्वस्तात माघारी परतला. सात महिन्याच्या गॅपनंतर विराट कोहली कशी कमगिरी करणार? यावर सपेन्स होता, चाहत्यांच्या पदरी निराशा झाली. पण विराटसोबत ऑस्ट्रेलियात एक गोष्ट पहिल्यांदाच घडली.. नेमकं काय झाले? ते पाहूयात. Mitchell Starc vs Virat Kohli head-to-head dismissals

विराटसोबत पहिल्यांदाच असं घडलं -

पर्थ वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरोधात विराट कोहली ८ चेंडूनंतर बाद झाला. स्टार्कच्या भेदक माऱ्यासमोर विराट कोहलीला खातेही उघडता आले नाही. विराट कोहली ऑस्ट्रेलियामध्ये वनडेत शून्यावर पहिल्यांदाच बाद झाला आहे. याआधी विराट कोहली ऑस्ट्रेलियामध्ये वनडेत कधीही शून्यावर बाद झाला नव्हता. दुसरीकडे स्टार्कने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीला आठव्यांदा तंबूचा रस्ता दाखवला. वनडेत स्टार्कने विराटला दुसऱ्यांदा बाद केलेय.

वनडे मालिके महत्त्वाची -

२०२७ च्या विश्वचषकाची तयारी टीम इंडियाकडून सुरू करण्यात आली आहे. त्याचाच भाग ऑस्ट्रेलियाचा दौरा आहे. तीन सामन्याच्या मालिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. विश्वचषकात खेळण्याच्या त्याच्या आशा याच मालिकेवर अवलंबून आहेत. पहिल्या सामन्यात किंग अपयशी ठरलाय. आता उर्वरित दोन सामन्यांमध्ये शानदार कामगिरी करण्याचे विराट कोहलीपुढे आव्हान असेल.

दबावात विराट कोहलीची फलंदाजी अधिकच चांगली होते, हे आपण अनेकदा पाहिलेय. किंग कोहली याच आव्हानाचा यशस्वी पाठलाग करेलच. ऑस्ट्रेलियामधील शानदार रेकॉर्ड ही विराटची जमेची बाजू आहे. पर्थमध्ये फ्लॉप गेला असला तरी अॅडलेड आणि सिडनीमध्ये विराटच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडेल, अशी चाहत्यांना अपेक्षा असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Winners List : बिग बॉस सीझन 1 ते 19; कोण कोण ठरलं BB ट्रॉफीचे मानकरी? पाहा विजेत्यांची यादी

Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna : पहिल्या नजरेत प्रेम! ९ वर्षांचा संसार; फिल्मी स्टाइल प्रपोज, वाचा गौरव खन्नाची प्यारवाली लव्हस्टोरी

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्नाने उचलली 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी; फरहाना भट्टला दिली मात

Bigg Boss 19 - Pranit More : 'बिग बॉस १९' चे घर गाजवणाऱ्या महाराष्ट्रीयन भाऊची संपत्ती किती?

Pranit More Struggle Journey : दादरची चाळ ते बिग बॉसचे घर कसा होता प्रणित मोरेचा संघर्षमय प्रवास? वाचा महाराष्ट्रीयन भाऊची कहाणी

SCROLL FOR NEXT