Virat kohli and anushka sharma  instagram
Sports

Virat Kohli On Drink Habit: 'दारू पिल्यानंतर मी आउट ऑफ कंट्रोल होतो..' विराट कोहलीचा पत्नी अनुष्का समोर मोठा खुलासा

Virat Kohli on his drink habit: विराट कोहली हा अनेकांसाठी आदर्श आहे. सर्वात फिट क्रिकेटपटूंच्या यादीत तो सध्या अव्वल स्थानी आहे

Ankush Dhavre

Virat Kohli Latest News: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा अनेकांसाठी आदर्श आहे. सर्वात फिट क्रिकेटपटूंच्या यादीत तो सध्या अव्वल स्थानी आहे.

अनेकदा तो फिटनेसबद्दल बोलताना देखील दिसून आला आहे. मात्र किंग कोहली दारू प्यायचा हे खूप कमी लोकांना माहीत असेल. पत्नी अनुष्कासमोर त्याने स्वतःने हा खुलासा केला आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्यात रॅपिड फायर राउंड सुरु होता. त्यावेळी जेव्हा विचारले गेले की, डान्स फ्लोअरवर असताना सर्वात जास्त धुमाकूळ कोण घालतं? त्यावेळी अनुष्का शर्माने विराट कोहलीकडे इशारा केला.

हे पाहून विराट कोहली आश्चर्यचजकित झाल्याचे पाहायला मिळाले. याबाबात बोलताना तो म्हणाला की,"मी डान्स फ्लोअरवर धुमाकूळ घालतो का? हे बोलताना विराट कोहलीने एक जुना किस्सा सांगितला आहे. (Latest sports updates)

एका मुलाखतीत विराट कोहलीने काही गोष्टींचा खुलासा केला आहे. विराटने कबुली दिली आहे की, त्याने प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आहे.

अनेकांना माहित असेल की , विराटला वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खायला आवडतात. मात्र त्याने फिटनेसवर लक्ष केंद्रित केल्यापासून या सर्व गोष्टींवर बंदी आणली आहे. मात्र विराट दारू पिऊन डान्स करायचा. (Virat kohli On His Drink Habit)

विराटने जुना किस्सा सांगत म्हटले की,' मी आता मद्यपान करत नाही. मात्र आधी मी पार्टीला गेल्यावर २ ड्रिंक घेतले की, मी आउट ऑफ कंट्रोल होऊन जायचो. २-३ ड्रिंक घेतले की मला कोणाचीच पर्वा नसायची. मात्र आता असं काहीच नाहीये. ही जुनी गोष्ट आहे. विराटचे हे उत्तर ऐकून अनुष्का आश्चर्यचकित झाली आणि नंतर हसली सुद्धा.

विराट कोहलीने आगामी आयपीएल स्पर्धेसाठी सराव करायला सुरुवात केली आहे. या स्पर्धेसाठी तो बंगळुरूमध्ये दाखल झाला आहे. सध्या तो जोरदार फॉर्ममध्ये देखील आहे. त्यामुळे त्याच्याकडून या हंगामात चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT