virat kohil 
Sports

इंडियाने टाॅस जिंकला : Virat Kohli संघाबाहेर; जाणून घ्या कारण

आता राहूल थेट भारतीय संघाचे नेतृत्व करीत आहे.

साम न्यूज नेटवर्क

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिका संघासमवेत आज हाेत असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट काेहली खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केएल राहुल संघाचे नेतृत्व करीत आहे. जोहान्सबर्ग येथील वँडरर्स स्टेडियमवर हाेत असलेल्या सामन्यात भारतीय संघाने टाॅस जिंकला असून केएल राहूलने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. virat kohli missed india vs south africa 2nd test

नाणेफेक जिंकल्यानंतर बोलताना कर्णधार राहुल (kl rahul) म्हणाला हनुमा विहारी हा आजच्या सामन्यात कोहलीच्या (virat kohli) जागेवर खेळणार आहे. पाठदुखीमुळे कोहली आजचा सामना खेळत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान विराटच्या अनुपस्थित अजिंक्य राहाणेने एकदा भारतात आणि ऑस्ट्रेलियात नेतृत्व केले आहे. या सामन्यांमध्ये भारतीय संघ हरलेला नाही. दोन्ही मालिका भारतीय संघाने जिंकल्या. आता अजिंक्य राहाणे संघात असतानाही राहुल कर्णधार आहे. काही महिन्यांपूर्वीच्या इंग्लंड दौऱ्यात राहुल यास संघात स्थान मिळाले नव्हते. मयांकला सरावात दुखापत झाल्याने राहुलला संघात संधी मिळाली आहे. आता राहूल थेट भारतीय संघाचे नेतृत्व करीत आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna: महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरी तुमरी

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलाय: रविंद्र चव्हाण

Nanded Crime: सोनू कल्याणकरच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट; हत्येमागील धक्कादायक कारण आलं समोर

PM Kisan yojana : ही गोष्ट केली तरच पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळणार, शेतकर्‍यांच्या कामाची गोष्ट

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच लक्ष्मण हाकेंच्या माघारीनंतरही नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT