Virat Kohli saam tv
Sports

Virat Kohli: 'भारतासाठी हा माझा शेवटचा वर्ल्डकप…’; विराटच्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ, रोहितनेही सांगितला प्लान

Virat Kohli 2027 World Cup: विराट कोहलीने 2027 चा वर्ल्डकप भारतासाठी आपला शेवटचा वर्ल्डकप असल्याचं सांगितलं आहे. रोहित शर्मानेही वर्ल्डकपला आपलं लक्ष्य असल्याचं स्पष्ट केलं. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे mfपासून भारताच्या 2027 वर्ल्डकप तयारीला सुरुवात होत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

भारतीय क्रिकेट टीमचा दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच फॉरमॅटमध्ये खेळतायत. मात्र पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्डकपसाठी दोघांनीही आपली तयारी आणि लक्ष्य स्पष्ट केलंय. 2027 मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या या मोठ्या स्पर्धेपूर्वी टीम इंडिया घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या सिरीजने नव्या सिझनची सुरुवात करणार आहे.

या सिरीजपूर्वी जिओस्टारशी बोलताना विराट कोहलीने 2027 च्या वर्ल्डकपसंदर्भात त्याची भूमिका स्पष्ट केलीये. भारतासाठी हा आपला शेवटचा वर्ल्डकप असेल, असं विराटने म्हटलं आहे. त्यामुळे वर्ल्डकप जिंकण्यासाठी मैदानात आपलं सर्वस्व पणाला लावण्याचा निर्धार त्याने व्यक्त केलाय.

विराट कोहली म्हणाला, "50 ओव्हर्सच्या वर्ल्डकपचा प्रभा इतर कोणत्याही स्पर्धेपेक्षा जास्त असतो. आता 10 सामने टी-20 सामन्याच्या intensity ने खेळायचे असतात. पण एका दिवसात तुम्ही अडीच टी-20 सामन्यांइतकं क्रिकेट खेळत असता. मोठ्या स्पर्धेत आणि वर्ल्डकपमध्ये 10 सामन्यांपर्यंत हीच तीव्रता कायम ठेवणं मोठं आव्हान असतं."

वर्ल्डकप परदेशात होणार असल्याने आव्हान आणखी वाढणार असल्याचंही विराटने सांगितलं. "यावेळी स्पर्धा परदेशातील परिस्थितीत होणार आहे. त्यामुळे त्याचा शरीरावर आणि मानसिकतेवरही मोठा परिणाम होतो. माझ्यासाठी भारताकडून खेळण्याचा हा शेवटचा वर्ल्डकप असेल आणि हीच माझी प्रेरणा आहे. मैदानावर आपलं सर्वस्व द्यायचं आहे. वर्ल्डकप जिंकणं हेच नक्कीच लक्ष्य आहे. त्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे," असं विराट म्हणाला.

रोहित शर्माचंही 'मिशन वर्ल्ड कप' स्पष्ट

दरम्यान रोहित शर्मानेही 2027 च्या वर्ल्डकपबाबत त्याची भूमिका स्पष्ट केली. 2023 च्या वर्ल्डकपमध्ये भारताला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे रोहितसाठी या स्पर्धेतलं 'अपूर्ण काम' अजूनही कायम आहे.

जिओस्टारशी बोलताना रोहित म्हणाला, "आपलं काम पूर्ण झालं आहे, असा विचार माझ्या मनात कधीच येणार नाही. तुम्ही जोपर्यंत खेळत आहात तोपर्यंत पुढे पाहण्यासाठी काही ना काही असतंच. त्यामुळे आता वर्ल्डकप हेच माझं लक्ष्य आहे."

आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये प्रत्येक सामना आणि प्रत्येक प्रतिस्पर्धी वेगळा असतो, असंही रोहितने सांगितलं. "जेव्हा वर्ल्डकप किंवा कोणतीही आयसीसी स्पर्धा खेळली जाते तेव्हा तिचं आव्हान वेगळं असतं. तुम्हाला वेगवेगळ्या टीम्सविरुद्ध खेळावं लागतं आणि वेगवेगळ्या मैदानांवर सामने होतात. त्यामुळे त्यासाठी वेगळी तयारी करावी लागते आणि वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो. हेच या स्पर्धेचं आव्हान आहे," असं रोहित म्हणाला.

उद्यापासून सुरु होणार वेस्ट इंडिज विरूद्धची सिरीज

उद्या भारत विरूद्ध वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सिरीजला सुरुवात होणार आहे. या सिरीजमधील पहिला वनडे सामना रविवारी 27 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. या सिरीजपासून भारताच्या 2027 वर्ल्डकपच्या तयारीलाही सुरुवात होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर तीन कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

मोठी बातमी! मुंबई-पुण्यातील स्विमिंग पूल आणि बांधकामांवर निर्बंध येणार? मंत्री बावनकुळेंचे संकेत, नेमकं काय म्हणाले?

Chanakya Niti: लग्नानंतर रोज भांडणं होतायेत? ही ५ कारणं नक्की जाणून घ्या! काहीच दिवसांत जाणवेल बदल

ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टात याचिका; वगळलेली मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्याची मोठी मागणी

Dategad Fort: दातेगडच्या कातळात कोरलेली तलवारीच्या आकाराची विहीर; या अनोख्या रचनेमागचं रहस्य नेमकं काय?

SCROLL FOR NEXT