Virat kohli  Saam Tv
Sports

Virat kohli : महिनाभर बॅटला हातही लावला नव्हता; विराट कोहलीने सांगितले कारण

प्रदीर्घ काळ सूर हरपल्याचा परिणाम मानसिकतेवर झाल्याचे विराट कोहलीने मान्य केले.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) खेळी खराब सुरू आहे. त्याच्या या खेळीवरुन त्याच्यावर अनेकांनी टीकाही केली आहे. सोशल मीडियावर त्याला रिटायर्डमेंट घेण्याचे सल्लेही काहींनी दिले आहेत. यावर आता विराटने प्रतिक्रिया दिली आहे. (Virat Kohli Latest News)

वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या T20 कारकिर्दीतील हा १०० वा सामना आहे. तो या सामन्यात चांगली खेळी करणार असं त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे. गेल्या २२ सामन्यांमध्ये त्याने फक्त एकदाच ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आशिया चषक सुरू होण्यापूर्वी त्याने या काळात आपल्या मानसिक आरोग्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. १० वर्षांच्या कारकिर्दीतील ही पहिलीच वेळ आहे जेव्हा त्याने महिनाभर बॅटला हात लावलेला नाही. इतकेच नाही तर या काळात मानसिक, भावनिक आणि शारीरिक थकवा कसा होता यावरही त्याने स्पष्टीकरण दिले आहे.

एका मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात त्याने अनेक मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले आहे. “दहा वर्षात पहिल्यांदाच मी माझ्या बॅटला महिनाभर हात लावलेला नाही. प्रबळ इच्छाशक्ती आपल्याला पुढे ढकलत असल्याचे मला उगाचच जाणवत होते, असे सांगून विराट (Virat Kohli) पुढे म्हणतो, इच्छाशक्ती प्रबळ असल्याचे मी स्वतःलाच सांगत होतो, पण माझे शरीर मला थांबण्याचे संकेत देत होते. काही काळ थांब आणि ब्रेक घे, असे माझे मन मला सांगत होते, असंही विराटने म्हटले आहे.

'मी स्वत:ला मानसिकदृष्ट्या खूप मजबूत समजतो जो मी आहे, पण प्रत्येकाची मर्यादा असते आणि तुम्हाला ती मर्यादा ओळखणे आवश्यक आहे. अन्यथा गोष्टी तुमच्यासाठी आरोग्यदायी नसतील. “या ब्रेकने मला बर्‍याच गोष्टी शिकवल्या ज्या मी सोडणार नाही, असंही विराट(Virat Kohli) म्हणाला. तसेच त्याने मानसिकतेवरही स्पष्टीकरण दिले आहे. "मी मानसिकदृष्ट्या खचत होतो हे कबूल करण्यात मला लाज वाटत नाही. मी त्याबद्दल बोललो नाही कारण मला अशक्त दिसायचे नव्हते", असंही विराट म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: 'चेस मास्टर' कोहलीचा धमाका; साईच्या शतकानंतरही गुजरातचा पराभव, आरसीबीचा दिमाखदार विजय

Petrol Price Hike: २९ एप्रिलनंतर पेट्रोल 28 रुपयांनी महागणार? मुंबई-पुण्यात किती होणार दर?

RCB vs GT : आरसीबीच्या नावावर नकोसा विक्रम; 'त्या' यादीत पहिल्या क्रमांकावर, मुंबई-चेन्नई कुठे?

भारतासाठी इराणचा ट्रम्पसोबत पंगा, भारताला नरक म्हटल्यानं इराणचा संताप

ST Bus Accident: काळाचा घाला! पाणी आणायला गेले अन् एसटीने बाप-लेकाला चिरडले; भंडाऱ्यात नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT