Virat Kohli  Saam Tv
क्रीडा

Virat Kohli T20I Rankings: पाकिस्तानची धुलाई करणाऱ्या विराट कोहलीला मिळालं तगडं गिफ्ट; सूर्यकुमारला फटका

पाकिस्तानचा विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिझवान अव्वल स्थानावर आहे

साम टिव्ही ब्युरो

Virat Kohli ICC T20 Ranking : टी २० वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या विराट कोहलीला मोठं गिफ्ट मिळालं आहे. पाकिस्तानविरुद्ध अर्धशतकी खेळी करून भारताला विजय मिळवून देणाऱ्या विराट कोहलीचं आयसीसीच्या रँकिंगमध्ये 'प्रमोशन' झालंय.

आयसीसीने (ICC) ने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या टी २० फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीला अव्वल १० मध्ये स्थान मिळालं आहे. कोहलीने पाकिस्तानविरुद्ध नाबाद ८२ धावांच्या केलेल्या खेळीमुळे नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. यापूर्वी तो टी २० फलंदाजांच्या क्रमवारीत १४व्या स्थानी होता. (Virat Kohli)

विराट कोहलीच्या तडाखेबंद नाबाद खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला. आयसीसी टी २० वर्ल्डकप स्पर्धेची या विजयाने धमाकेदार सुरुवात झाली. मेलबर्नच्या क्रिकेट मैदानात विराट कोहलीने अविस्मरणीय खेळी केली. त्याने आपल्या टी २० कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करून चाहते आणि प्रेक्षकांना दिवाळीचं मोठं गिफ्ट दिलं. (Cricket News)

दमदार पुनरागमन

विराट कोहली गेल्या तीन वर्षांपासून खराब फॉर्मशी झुंज देत होता. त्याच्या बॅटमधून शतकी खेळी साकारली गेली नव्हती. मात्र, आशिया कप स्पर्धेत त्याने दमदार पुनरागमन केलं. ऑगस्टमध्ये कोहली हा टी २० क्रमवारीत ३५ व्या स्थानावर होता. मात्र, आता त्याने अव्वल १० फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. आशिया कप स्पर्धेत त्याने शतकही ठोकलं. त्यानंतर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धच्या मालिकांमध्ये दमदार फलंदाजी केली.

सूर्यकुमार तिसऱ्या स्थानी

पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवान हा सध्या आयसीसी टी २० फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानी आहे. त्याचे ८४९ गुण आहेत. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा फलंदाज डेव्हन कॉन्व्हे आहे. त्याचे ८३१ गुण आहेत. यापूर्वी दुसऱ्या स्थानी सूर्यकुमार यादव होता. आता तो ८२८ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. कॉन्व्हेने वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८९ धावा केल्या होत्या. तर सूर्यकुमारला पाकिस्तानविरुद्ध मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानचा बाबर आझम हा चौथ्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेचा एडेन मार्क्रम हा पाचव्या स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT