Virat Kohli canva
Sports

Virat Kohli : चाहत्यांची प्रचंड गर्दी, तो आला अन् तिला मिठी मारली, 'ती' महिला कोण? जिच्यासाठी कोहलीने केली नाही सुरक्षेची पर्वा, VIDEO व्हायरल

Virat Kohli Hugged Woman On Bhuveneshwar Airport: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली भुवनेश्वर विमानतळावरून अहमदाबादला जाण्यासाठी आला तेव्हा त्याने चाहत्यांच्या गर्दीतील एका महिलेला मिठी मारली. विराट कोहलीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टिम इंडिया सध्या इंग्लंड विरुद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळत आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्या बुधवारी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यासाठी अहमदाबादमध्ये आहे.मालिकेतील दुसरा सामना ओडिशातील कटक येथे खेळला गेला ज्यामध्ये भारताने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला. मालिकेतील तिसरा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यासाठी जेव्हा टीम इंडिया भुवनेश्वर विमानतळावर पोहोचली तेव्हा विराट कोहलीने असे काही केले जे कोणालाही अपेक्षित नव्हते.

विमानतळावर प्रवेश करताना चाहत्यांच्या गर्दीतून कोहलीने एका महिलेला मिठी मारली. हे पाहून तेथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. विमानतळावर कडक सुरक्षा होती परंतु कोहलीने कशाचीही पर्वा न करता चाहत्यांच्या गर्दीत महिलेला मिठी मारली.

ती महिला कोण होती

कोहलीने त्या महिलेला मिठी मारली असता, प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण झाला की,ही महिला कोण होती? आणि कोहलीने तिला का मिठी मारली? कोहलीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. आणि प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की भुवनेश्वर विमानतळावर कडक सुरक्षेत कोहलीने जिला मिठी मारली होती ती मुलगी कोण आहे? सोशल मीडियावर कोहलीचे अनेक फॅन पेज आहेत, त्यापैकी एकाने दावा केला आहे की, ही मुलगी कोहलीची जवळची नातेवाईक आहे. परंतु अधिकृतपणे याची पुष्टी करण्यात आलेली नाही.

ज्या प्रकारे विराट कोहलीने त्या महिलेला मिठी मारली त्यावरुन असे दिसून येते की, तो या मुलीला चांगलच ओळखतो आणि म्हणूनच त्याने स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी न करता तिला जाऊन तिला मिठी मारली. अनेकांना ती महिला कोण आहे याबद्दल उत्सुकता होती कारण कोहलीच्या हावभावावरून असे वाटले की तो त्या व्यक्तीला आधीच ओळखत होता. कोहली निघताना त्या महिलेला काहीतरी सांगत असल्याचेही दिसून आले.

कोहलीकडून भारताला विराट अपेक्षा

नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात दुखापतीमुळे कोहली खेळू शकला नाही. उजव्या गुडघ्यात सूज आल्याने त्याला संघाबाहेर जावे लागले. पण तो कटकमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळला. या सामन्यात त्याच्याकडून मोठी खेळी अपेक्षित होती, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. आता सर्वांचे लक्ष अहमदाबादमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यावर आहे. या सामन्यात कोहली त्याच्या फॉर्ममध्ये परतेल अशी अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT