Virat Kohli CSK VS RCB x (twitter)
Sports

Virat Kohli : पाथिराणाचा बाउन्सर जोरात विराटच्या हेल्मेटला लागला अन् विराट भडकला, पुढे जे घडलं... पाहा Video

Virat Kohli IPL 2025 : मथिशा पाथिराणाच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर विराट कोहलीच्या हेल्मेटवर बॉल आदळला. त्यानंतर विराटने रागाच्या भरात पाथिराणाच्या ओव्हरमध्ये तुफान फलंदाजी केली. त्याचे व्हिडीओ, फोटो व्हायरल होत आहे.

Yash Shirke

Virat Kohli RCB vs CSK : चेन्नईच्या चेपॉक म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स ही आयपीएल २०२५ मधली लढत सुरु आहे. या सामन्यात सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचे ठरवले. त्यानंतर विराट कोहली आणि फिल सॉल्ट फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये उतरले.

चौथ्या ओव्हरमध्ये फिल सॉल्ट बाद झाला. त्याने १६ बॉल्समध्ये ३२ धावा केल्या. त्यानंतर आलेला देवदत्त पडिकलने २७ धावा केल्या. त्यानंतर विराट कोहली आणि कर्णधार रजत पाटीदारने सावधपणे खेळ पुढे नेला. तेव्हा दहाव्या ओव्हरमध्ये सीएसकेच्या मथिशा पाथिराणाने टाकलेला बॉल विराट कोहलीच्या हेल्मेटवर जोरात आदळला. त्यानंतर विराटने पुढच्या दोन बॉल्सवर दहा धावा काढल्या.

नेमकं काय घडलं?

दहाव्या ओव्हरमध्ये मथिशा पाथिराणा बॉलिंग करायला आला. ओव्हरचा पहिलाच बॉल जोरात विराट कोहलीच्या हेल्मेटवर जाऊन आदळला. त्यानंतर विराटने स्वत:ला सावरले. पाथिराणाच्या दुसऱ्या बॉलवर विराटने दमदार सिक्स मारला. सिक्सनंतर तिसऱ्या बॉलवर किंग कोहलीने फोर मारला. पहिल्या तीन बॉल्समध्ये विराटने १० धावा केल्या.

बंगळुरूची प्लेईंग ११ -

विराट कोहली, फिल साल्ट, देवदत्त पडिकल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, यश दयाल.

चेन्नईची प्लेईंग ११ -

रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, सॅम करन, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मथिशा पाथिराणा, खलील अहमद.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT