virat kohli sachin tendulkar saam tv
क्रीडा

Virat Kohli Record: सचिन तेंडुलकरचा महारेकॉर्ड विराटच्या रडारवर! अवघ्या इतक्या धावा करताच इतिहास रचणार

Virat Kohli, Most Runs In International Cricket Record: भारतीय संघातील प्रमुख फलंदाज विराट कोहलीला सचिन तेंडुलकरच्या एका मोठ्या रेकॉर्डच्या जवळ जाण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-२० क्रिकेटला रामराम ठोकला आहे. टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा झाल्यानंतर या दोघांनीही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र हे दोघेही खेळाडू वनडे आणि कसोटी क्रिकेट खेळताना दिसून येणार आहेत.

नुकताच दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेसाठी चारही संघांची घोषणा करण्यात आली आहे. या संघात विराट कोहली आणि रोहित शर्माचा समावेश करण्यात आलेला नाही. या दोघांनाही विश्रांती देण्यात आल्याची माहिती जय शहा यांनी दिली. दरम्यान हे दोघेही खेळाडू बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून कमबॅक करताना दिसून येणार आहेत.

विराट कोहलीच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठ मोठ्या रेकॉर्डची नोंद आहे. विराट कोहली बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे. विराटने आतापर्यंत ११३ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याला ४९.१५ च्या सरासरीने ८८४८ धावा करता आल्या आहेत.

यादरम्यान त्याने २९ शतक आणि ३० अर्धशतक झळकावली आहेत. बांगलादेशविरुद्ध खेळतानाही त्याची बॅट चांगली तळपते, त्याने ६ सामन्यातील ९ डावात ४३७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतकं झळकावली आहेत.

बांगलादेशविरुद्ध मोठा रेकॉर्ड करण्याची संधी

विराट कोहलीला या मालिकेतील पहिल्या सामन्यात मोठा रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे. बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यात ५८ धावा करताच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७ हजार धावांचा शिखर गाठणार आहे.

यासह विराटला दिग्गज खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवण्याची संधी असणार आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा आणि रिकी पाँटिंग यांना हा कारनामा करण्यात आला आहे.

विराट कोहलीने आतापर्यंत आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधील ५३३ सामन्यांमध्ये २६९४२ धावा केल्या आहेत. या यादीत भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. सचिनच्या नावे ६६४ सामन्यांमध्ये ३४३५७ धावा करण्याची नोंद आहे.

तर दुसऱ्या स्थानी असलेल्या कुमार संगकाराने ५९४ सामन्यांमध्ये २८०१६ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्याने ५६० सामन्यांमध्ये २७४८३ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Exit Poll : अजित पवार की शरद पवार, चिपळूणमध्ये कौल कुणाला? एक्झिट पोल कुणाच्या बाजूने? VIDEO

Pune Cantonment Exit Poll : पुणे कॅन्टोनमेंटमध्ये रमेश बागवे आमदार होणार? पाहा Exit Poll

World Travel : स्वित्झर्लंडपेक्षा लय भारी भारतातील 'हे' ठिकाण

Maharashtra Exit Poll: भुसावळमध्ये भाजपचे संजय सावकारे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Tongue colour Health: जिभेचा बदललेला रंग देतात 'या' गंभीर आजारांचे संकेत, तुमच्या जिभेचा रंग कोणता?

SCROLL FOR NEXT