Virat Kohli-Gautam Gambhir Fight
Virat Kohli-Gautam Gambhir Fight SAAM TV
क्रीडा | IPL

Virat Kohli-Gautam Gambhir : गौतम गंभीरसोबतच्या वादानंतर १.०७ कोटींचा दंड विराट कोहली भरणार नाही, कारण...

Nandkumar Joshi

Virat Kohli-Gautam Gambhir Fight : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा फलंदाज विराट कोहली आणि माजी क्रिकेटपटू आणि लखनऊ संघाचा मेंटॉर गौतम गंभीर यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर बीसीसीआयने कोहली आणि गंभीरला दंड ठोठावला. दोघांच्या सामन्याचे १०० टक्के मानधन दंड म्हणून आकारण्यात येणार आहे. पण दोघांचे नेमके किती रुपयांचे नुकसान झाले किंवा ती दंडाची रक्कम कोण भरणार असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.

विराट कोहलीची (Virat Kohli) आयपीएल सॅलरी साधारण १५ कोटी रुपये आहे. म्हणजेच त्याला वर्षाला १५ कोटी रुपये आरसीबीकडून दिले जातात. त्याच्या एका सामन्याचे मानधन हे १.०७ कोटी रुपये आहे. लखनऊ विरुद्ध झालेल्या सामन्यात झालेल्या वादानंतर त्याला १.७ कोटी रुपयांचे नुकसान झाले. एका मोसमात १४ लढतींच्या आधारे त्याची एका सामन्याच्या मानधनाची रक्कम ठरते.

कोहलीला सुनावलेल्या दंडाची रक्कम कोण भरणार?

बेंगळुरू संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आणि त्यांचा पुढील प्रवास सुरू राहिला तर सामन्यांच्या संख्येवर प्रत्येक सामन्याचे मानधन निश्चित होईल. एकूणच कोहलीचे १ कोटी रुपयांचे नुकसान होईल. तरीही त्याला काहीही फरक पडणार नाही असे सांगितले जाते. (IPL 2023)

कारण ही दंडाची रक्कम स्वतः विराट कोहली भरणार नाही तर, त्याची मालकी असलेला संघ भरणार आहे. क्रिकबझच्या माहितीनुसार, फ्रॅन्चाइजी कोहलीच्या मानधनात कपात करणार नाही. त्याचा भार स्वतः उचलणार आहे.

गंभीरला २५ लाखांचा दंड

गौतम गंभीरच्या एका सामन्याचे मानधन २५ लाख रुपये आहे. त्याला सुनावलेल्या दंडाची रक्कमही फ्रँचाइजी भरणार आहे. बहुतांश फ्रँचाइजी या खेळाडूंना सुनावलेल्या दंडाची रक्कम स्वतः भरत असते. इतकेच काय तर स्लो ओव्हर रेटसाठीचा दंडही स्वतः संघ भरतं. दंड आकारूनही फ्रँचाइजी खेळाडूंच्या मानधनातील रक्कम कपात करत नाहीत.

बीसीसीआय बिल पाठवतं

आयपीएलचं पर्व संपल्यानंतर बीसीसीआयकडून टीमला दंडस्वरुपात आकारलेल्या रकमेचे बिल पाठवते. त्यानंतर संबंधित फ्रँचाइजी ते बिल अदा करते. फ्रँचाइजी संबंधित खेळाडूंच्या मानधनातून दंडाची रक्कम वसूल करून घेते का ही संघाची अंतर्गत बाब आहे. पण बहुतांश संघ हे खेळाडूंवर दंडाच्या रकमेचा भार टाकत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नितीन गडकरी आणि आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर

Maharashtra Weather Forecast: काळजी घ्या! आजही अवकाळीचा इशारा कायम, विजांच्या कडकडासह पावसाच्या सरी कोसळणार

Nigeria Bomb Blast: प्रॉपर्टीच्या वादातून प्रार्थनास्थळात बॉम्बस्फोट; ८ जणांचा मृत्यू, १६ जखमी

Mumbai Lok Sabha: मुंबईत आज पॉलिटिकल ब्लॉकबस्टर; शिवाजी पार्कवर PM मोदी अन् राज ठाकरे, तर बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तीप्रदर्शन

Rashi Bhavishya: आज 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, पैशाची आवक वाढेल

SCROLL FOR NEXT