suresh raina  saam tv
Sports

Suresh Raina Statement: कोहली - गंभीर वादामागचं नेमकं कारण काय? सुरेश रैनाने केला खुलासा

Suresh Raina On Virat - Gambhir Fight : हे भांडण होण्यामागचं कारण काय? याचा खुलासा माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाने केला आहे.

Ankush Dhavre

LSG VS RCB IPL 2023: भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर आणि विराट कोहली जेव्हा जेव्हा आमने सामने येतात तेव्हा राडा होतोच. २०१३ मध्ये जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात हे दोघेही आमने सामने आले होते. त्यानंतर जेव्हा जेव्हा हे दोघे सामने आले त्यावेळी वादाची ठिणगीच पेटली.

सोमवारी लखनऊच्या मैदानावर झालेल्या सामन्यात देखील असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले आहे. सामना झाल्यानंतर या दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले होते.

दरम्यान हे भांडण होण्यामागचं कारण काय? याचा खुलासा माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाने केला आहे.

वाद विराट आणि नवीन उल हक यांच्यात सुरु होता. मात्र गौतम गंभीर मध्ये पडला आणि दोघांमध्ये वातावरण तापलं. हा वाद इतका वाढला की, खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना मध्यस्थी करावी लागली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विराट कोहली आणि गौतम गंभीर भांडताना दिसून येत आहेत.

तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि लखनऊचा गोलंदाज अमित मिश्रा भांडण सोडवताना दिसून येत आहेत. (Latest sports updates)

काय म्हणाला सुरेश रैना?

विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात बाचाबाची झाल्यानंतर विराट कोहली केएल राहुल सोबत चर्चा करताना दिसून आला होता. त्यावेळी समालोचन करत असलेल्या सुरेश रैनाला अँकरने विचारलं की, तुला काय वाटतं? हे दोघे काय चर्चा करत असतील. यावर उत्तर देत सुरेश रैना म्हणाला की, 'तो देखील तेच म्हणत असेल जे आपण म्हणतो. की, मी काहीच केलं नाहीये. मी असं काही करत नाही मात्र ते होऊन जातं. हा विराटचा जोश आहे. मला तर वाटतं की, सामना झाल्यानंतर मॅच रेफ्री त्याला बोलवून घेतील. कारण जे काही घडलं ते क्रिकेटसाठी ठीक नव्हतं.'

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा विजय

या सामन्यात नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० षटक अखेर ९ गडी बाद १२६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाला १०८ धावा करता आल्या. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १८ धावांनी विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार बोनस; कुणाला किती रुपये मिळणार?

दसरा मेळाव्याआधी शिंदेसेनेचे टेन्शन वाढलं, सभेसाठी पदाधिकारी मिळेना?

Hand Sweating Problem: हाताला घाम का येतो? शरीरात नेमकं काय घडतं तेव्हा असं होतं?

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, आणखी एकाला अटक; हरियाणा कनेक्शन उघड

Maharashtra News Live Update: बीडमध्ये दोन दसरा मेळावे; मनोज जरांगे आणि मुंडे बंधूंच्या भाषणाकडे राज्याचं लक्ष

SCROLL FOR NEXT