Hand Sweating Problem: हाताला घाम का येतो? शरीरात नेमकं काय घडतं तेव्हा असं होतं?

Manasvi Choudhary

हाताला घाम येण्याची समस्या

अनेकदा आपण कोणतेही शारीरिक मेहनत किंवा कष्टाचे न करूनही हाताच्या तळव्यांना घाम येतो. अनेकदा याकडे सामान्य समजून दुर्लक्ष करतो परंतु वारंवार असा त्रास होत असेल तर ते शरीरातील या आजाराचे लक्षण असू शकते. ज्याला 'हायपरहायड्रोसिस' म्हणतात.

Hand Sweating Problem

हाताला घाम येण्याची मुख्य कारणे

हाताला घाम येण्याची मुख्य ५ कारणे कोणती आहेत ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Hand Sweating Problem | yandex

प्रायमरी हायपरहायड्रोसिस

हाताला जास्त घाम येण्याचे हे सर्वात सामान्य कारण आहे. यामध्ये मज्जासंस्थेतील बिघाडामुळे घामाच्या ग्रंथी अतिसक्रिय होतात. यात प्रामुख्याने दोन्ही तळहातांना आणि पायांच्या तलव्यांना जास्त घाम येतो, मात्र झोपेत असताना हा घाम सहसा थांबतो.

| pinterest

मानसिक ताणतणाव आणि चिंता

जेव्हा आपण प्रचंड तणावात किंवा टेन्शनमध्ये असतो, तेव्हा शरीराचे सिम्पेथेटिक मज्जामंडळ सक्रिय होते. यामुळे तळहात, पाय आणि कपाळावर घाम फुटण्याचे प्रमाण वाढते.

Stress & Anxiety | pinterest

थायरॉईडची समस्या

शरीरात थायरॉईड ग्रंथीचे कार्य असंतुलित झाल्यास चपचय (Metabolism) बिघडतो, ज्यामुळे शरीराचे तापमान वाढून अतिप्रमाणात घाम येण्याची समस्या निर्माण होते.

Thyroid Issues | pinterest

रक्तातील साखरेची पातळी कमी होणे

मधुमेह असलेल्या किंवा रक्तातील साखरेची पातळी अचानक कमी (Hypoglycemia) झालेल्या व्यक्तींच्या हाताला कंप सुटणे आणि घाम येणे अशी लक्षणे दिसतात.

Low Blood Sugar | pinterest

हार्मोनल बदल आणि औषधे

महिलांमध्ये रजोनिवृत्तीच्या (Menopause) काळात किंवा शरीरात हार्मोनल बदल होत असताना उष्णतेच्या लाटा आल्यासारखे वाटून घाम सुटू शकतो. तसेच काही ठराविक औषधांच्या सेवनामुळेही हा त्रास होऊ शकतो.

medicine | Google

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: 14 Days Without Sugar: 14 दिवस साखर खाणं बंद केलं तर शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

14 Days Without Sugar
येथे क्लिक करा...