Virat Kohli Net Worth Saam Tv
Sports

HBD Virat Kohli: महागड्या गाड्या, अलिशान घर; दिवसाला कमावतो 5 कोटी! विराटची एकूण संपत्ती किती?

Virat Kohli Net Worth: विराट कोहली आज आपला ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. विराट कोहली हा १००० कोटींचा मालक आहे. भारतातील श्रीमंताच्या यादीत विराट कोहलीचा नंबर अव्वल क्रमाकांवर आहे.

Siddhi Hande

भारतीय क्रिकेट टीमचा स्टार खेळाडू विराट कोहली आज आपला ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. विराट कोहली हा आपल्या चौकार आणि षटकाराने तर समोरच्या टीमला मात देतो. परंतु संपत्तीच्या बाबतीतदेखील विराट कोहली देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे. फॉर्च्युन इंडियाने देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत विराट कोहलीचा समावेश केला आहे. विराट कोहलीकडे जवळपास १००० कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे.

विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ रोजी झाले. विराटला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. विराट क्रिकेटशिवाय सोशल मिडिया, ब्रँड एडॉर्समेंट, इन्व्हेस्टमेंट या माध्यमातूनदेखील पैसे कमावतो. रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीची नेट वर्थ १२७ मिलियन डॉलर म्हणजेच १०४६ कोटी रुपये आहे. विराट कोहली वर्षाला १५ कोटी रुपये कमावतो. तर महिन्याभरात १,२५,००,००० रुपये कमावतो. विराटची एका दिवसाची कमाई ५,७६,९२३ रुपये आहे. (Viral Kohli Birthday Special)

विराट कोहली क्रिकेटमधून लाखो रुपये कमावतो. याचसोबत जाहिरात, ब्रँड एडोंर्समेंटमधून पैसे कमावतो. तसेच त्याने अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली एका टेस्टसाठी १५ लाख रुपये, वनडेसाठी ६ लाख रुपये तर T20 साठी ३ लाख रुपये घेतो. तसेच BCCLच्या A+ कॉन्ट्रॅक्टमधून तो वर्षाला ७ कोटी रुपये कमावतो.

विराट कोहली सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील कोट्यवधी रुपये कमावतो. त्याचे सोशल मीडियावर २६० मिलियन फॉलोवर्स आहेत. तो एका पोस्टसाठी ६-११ कोटी रुपये घेतो.

क्रिकेट विश्वातील सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या लोकांमध्ये विराट कोहलीचा नंबर अव्वल आहे. विराट कोहलीने २०१४ मध्ये ६६ कोटी रुपयांचा टॅक्स भरला होता. विराट कोहलीने अनेक कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. तसेच तो PUMA, Hero, MRF,Boost, Fasstrack या कंपनीच्या जाहिरातींमध्ये काम करतो. यातूनही त्याला कोट्यवधी रुपये मिळतात. (Virat Kohli Net Worth)

विराट कोहलीची लाइफस्टाइल खूप लक्झरी आहे. त्याच्याकडे महागड्या कारचे कलेक्शन आहे. त्याच्याकडे Audi Q7 (७० ते ८० लाख),Audi RS5 (१.१ कोटी), Audi R8 LMX (२.२९ कोटी), Audi A8L W12 Quattaro (१.९८ कोटी), Land Rover Vogue (२.२६ कोटी) या कार आहेत. (Virat Kohli Car Collection)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मतचोरीच्या खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही',: मुख्य निवडणूक आयुक्त

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update: पेशवे जयंतीनिमित्त रॅली मध्ये सहभाग घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी चालवली दुचाकी

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा, PCB चा बाबर आझम-मोहम्मद रिझवानला धक्का

SCROLL FOR NEXT