virat kohli  twitter
Sports

Amit Mishra On Virat Kohli: 'प्रसिद्धी मिळाल्यानंतर विराट खूप बदललाय..'दिग्गज खेळाडूची जोरदार टीका

Amit Mishra Statement: भारतीय संघाचा माजी गोलंदाज अमित मिश्राने स्टार फलंदाज विराट कोहलीवर मोठे आरोप केले आहेत.

Ankush Dhavre

भारतीय संघाने अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली. या संपूर्ण स्पर्धेत विराटची बॅट शांत राहिली. मात्र फायनलमध्ये त्याने कसर काढली आणि दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना रडवत शानदार अर्धशतक झळकावलं. या निर्णयाक खेळीच्या बळावर भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभारली. ही स्पर्धा जिंकल्यानंतर विराटने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे.

दरम्यान भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्याने म्हटलंय की, प्रसिद्धी मिळण्याआधीचा विराट हा वेगळा होता आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतरचा विराट हा वेगळा आहे.

काय म्हणाला अमित मिश्रा?

अमित मिश्राने एका पॉडकास्टमध्ये सहभाग घेतला होता. या पॉडकास्टमध्ये विराट कोहलीबाबत बोलताना तो म्हणाला की,' मी विराटला बदलताना पाहिलंय. आम्ही एकमेकांसोबत बोलणं बंद केलं होतं. जेव्हा प्रसिद्धी मिळते तेव्हा लोकं विचार करतात की समोरचा व्यक्ती आपल्याशी कुठल्या उद्देश्याने बोलतोय. जेव्हा तो १४ वर्षांचा होता, तेव्हापासून मी त्याला ओळखतोय. ज्यावेळी तो समोसा खायचा, त्याला रात्री पिझ्झा हवाच असायचा. मी ज्या चिकूला ओळखायचो आणि हा जो कर्णधार विराट आहे, तो खूप वेगळा आहे. जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा तो आदराने बोलतो. मात्र आता आधीसारखं काहीच राहिलं नाही.'

विराट कोहली सध्या लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत आहे. टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेनंतर तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी लंडनला रवाना झाला आहे. विराटसह रोहित शर्मादेखील सध्या सुट्ट्यांचा आनंद घेतोय. नुकतेच रोहित शर्माने विम्ब्लडन २०२४ स्पर्धा पाहण्यासाठी हजेरी लावली होती.

टी-२० क्रिकेटला ठोकला रामराम

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना पार पडला होता.या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. दरम्यान ही स्पर्धा जिंकताच विराट कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. दरम्या विराटसह रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजानेही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2025 Astrology: नोकरीत बढती अन् आर्थिक चणचण होणार दूर; या ४ राशींचे व्यक्ती मालामाल

Nandurbar : क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून वाहतूक; अधिकारी हप्ते घेत असल्याचा आरोप, परिवहन विभागाच्या आशीर्वादाने अवैध वाहतूक

Rangoli Tips: दारासमोर काढलेली रांगोळी फेकून देऊ नका, असा करा वापर, भांडी होतील झटक्यात चकाचक

Maharashtra Live News Update : निवडणूक आयोगाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी मोर्चा काढणार - बाळा नांदगावकर

Viral Resignation Letter : "टार्गेट वाढतं, पण पगार नाही..." कंपनीला वैतागून घेतला तडकाफडकी निर्णय, सोशल मीडियावर राजीनामा व्हायरल

SCROLL FOR NEXT