virat kohli twitter
Sports

Virat Kohli: कोहली तुस्सी ग्रेट हो...! विराट चौथ्यांदा ठरला आयसीसी वनडे प्लेअर ऑफ द इअर

Virat Kohli ICC Men's ODI Cricketer of the Year : आयसीसीने २०२३ साठी प्लेअर ऑफ द इअरची घोषणा केली आहे. आयसीसीने टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला वनडे प्लेअर ऑफ द इअर घोषित केला आहे.

Vishal Gangurde

Virat Kohli ICC Men's ODI Cricketer of the Year :

आयसीसीने २०२३ साठी वनडे प्लेअर ऑफ द इअरची घोषणा केली आहे. आयसीसीने टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला वनडे प्लेअर ऑफ द इअर घोषित केला आहे. कोहली चौथ्यांदा या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. कोहली पुरस्काराचा मानकरी ठरत नवा इतिहास रचला आहे. (Latest Marathi News)

विराट कोहली चौथ्यांदा आयसीसीचा प्लेअर ऑफ द इअर होण्याची विक्रमी कामगिरी केली आहे. विराट कोहलीसाठी २०२३ हे वर्ष चांगलं ठरलं आहे.

विराट कोहली विक्रमी कामगिरी

विराट कोहलीने २०२३ या वर्षात विक्रमी कामगिरी केली आहे. विराटने आयसीसी वनडे विश्वचषकात धमाकेदार खेळ दाखवला. या स्पर्धेत विराट कोहलीने वनडेमधील सचिन तेंडुलकरचा ४९ शतकांचा विक्रम तोडला. विराट कोहलीने वनडेमधील ५० शतक पूर्ण केले आहेत. विराट कोहलीने विश्वचषक स्पर्धेत ७६५ धावा केल्या. विराटने या वर्षात एकूण १३७७ धावा कुटल्या आहेत. विराट कोहलीने आठव्यांदा एका वर्षात एक हजारांहून अधिक धावा कुटल्या आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विराट कोहलीचा वनडेमधील रेकॉर्ड

विराट कोहलीने आतापर्यंत एकूण २९२ वनडे सामने खेळले आहेत. त्याने या सामन्यात एकूण १३,८४८ धावा कुटल्या आहेत. विराटने ५८.६७ ची सरासरी आणि ९३.५८ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. त्याने ५० शतकासहित ७२ अर्धशतक ठोकले आहेत. त्याने वनडेत १२९४ चौकार आणि १५१ षटकार लगावले आहेत. कोहलीने वनडेत सर्वाधिक १८३ धावा केल्या आहेत.

आयसीसीने चार खेळाडूंना केलं होतं नॉमिनेट

आयसीसीने वनडे प्लेअर ऑफ द ईअरसाठी विराट कोहली व्यतिरिक्त शुभमन गिल, मोहम्मद शमी याच्या सामावेश झाला होता. तसेच न्यूझीलंडच्या डेरिल मिचेलच्या नावाचाही सामावेश होता. मात्र, या सर्व खेळाडूंना मागे टाकत विराट कोहलीने हा पुरस्कार पटकावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT